सावंतवाडी : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी गुरुवारी गोव्यात नेऊन या गुन्ह्याच्या कटाबाबत चौकशी केली.

सुमारे दीड महिन्याच्या कायदेविषयक लढाईनंतर नितेश यांना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्यात बुधवारी संध्याकाळी पोलिसांना यश आले. कणकवली येथील न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत (४ फेब्रुवारी) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पोलीस तातडीने तपासाच्या कामाला लागले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार नितेश यांना बुधवारी रात्रीच कणकवलीहून सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलवण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास राणे यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीबाबतचा तपशील मिळू शकला नाही.  या हल्लाप्रकरणी त्यांच्यावर कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Constable also involved in child abduction in Jalgaon district five suspects arrested
जळगाव जिल्ह्यातील बालक अपहरणात हवालदाराचाही हात, पाच संशयितांना अटक
n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल