महसूलसारख्या विभागात चांगले काम केल्याबद्दल आदर्श तहसीलदार पुरस्कार मिळालेल्या अधिकाऱ्याने या आदर्शालाच कलंक फासल्याचा प्रकार समोर आला. कुळाची जमीन परत मिळाण्याच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० लाख रूपयांची लाच मागितली. दरम्यान, वकिल आणि मदतनिसाच्या हाताने १ लाख रूपयांची लाच घेताना पैठणचे तहसीलदार महेश नारायण सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

महसूल प्रशासनातील आदर्श व्यक्तिमत्व अशी महेश सावंत यांची ओळख आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा आदर्श तहसीलदार म्हणून नुकताच गौरव करण्यात आला होता. आदर्श तहसीलदारालाच लाच घेताना पकडण्यात आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!

अ‍ॅड. कैलास सोपान लिपने पाटील (३८,रा. मित्रनगर) आणि मदतनिस बद्रीनाथ कडुबा भवर (३५, रा.भानुदासनगर)अशी अन्य आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने पैठण तालुक्यातील पांगरा येथील १२ एकर १४ आर कुळाची जमीन खरेदी केली आहे. ही जमीन परत मिळावी, म्हणून मूळ मालकाच्या नातेवाईकांनी पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे दावा दाखल केला होता. हे प्रकरणाची सुनावणीसाठी आले. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी तहसीलदार सावंत यांनी अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि  बद्रीनाथ भवर यांच्यामार्फत ३० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने  याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाच मागितली. त्यानंतर रविवारी (२९ सप्टेंबर) पैठण तहसील कार्यालयात एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. यावेळी तहसीलदार सावंत यांनी त्यांच्या कार्यालयातच अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि बद्रीनाथ यांच्या उपस्थितीत लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून एक लाख रुपये घेतले. लाचेची रक्कम घेताच पोलिसांनी आरोपींना रक्कमेसह रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केली. पोलीस नाईक बाळासाहेब राठोड, गोपाल बरंडवाल, रविंद्र अंबेकर आणि संदीप आव्हाळे यांनी त्यांना मदत केली.