आरोग्यास धोकादायक असल्याची बाब उघड

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

पालघर : मानवी आरोग्यास आणि पर्यावरणाला धोका पोचवणाऱ्या मांगूर जातीच्या माशाचे उत्पादन, वाहतूक आणि विक्रीवर केंद्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातही थाय मांगूर आणि आफ्रिकन मांगूर प्रजातीच्या मांगूर मासा उत्पादनावर बंदी असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी सांगितले. अशा प्रजातीच्या माशांची मत्स्यशेती व विक्री करणाऱ्यांविरोधात शोध मोहीम घेऊन त्यामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

बांगलादेशमार्फत बेकायदा पद्धतीने या प्रजातीचे हे मासे भारतात दाखल झाले असून काळ्या मांगूर माशामुळे मानवी जीवनासह पर्यावरणावर गंभीर परिणाम दिसून आला आहे. या माशाचे सेवन केल्याने अनेक रोगांना बळी पडण्याची शक्यता आहे. त्याच बरोबरीने अलीकडेच चीनसारख्या देशात पसरलेल्या रोगाच्या पार्श्वभूमीवर या प्रजातीचा मासा भारतात अन्नपदार्थात खाण्यालायक नाही व त्याची दाहकता लक्षात घेता तो बंदी घालण्यात आलेला आहे. मात्र गडद पिवळ्या रंगाच्या देशी मांगूर माशाच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी नसल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

थायलंड वा आफ्रिकन मांगूर मासा हा मांसभक्षक असल्याने पर्यावरण व आरोग्याला घातक आहे. या माशाला टाकाऊ  मांसल पदार्थ टाकले जात असल्याने पर्यावरणालाही ते घातक आहे. ज्या ठिकाणी यांची मत्स्यशेती होते त्या ठिकाणी असे टाकाऊ  पदार्थ टाकल्यामुळे तेथील पर्यावरणाला आणि तेथील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ  शकतो. या पार्श्वभूमीवर विदेशी जातीच्या मांगूर माशाला वेळीच आळा घालणे अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात कुठेही काळ्या मांगूरची मत्स्यशेती तसेच हा मांगूर मासा खुल्या बाजारात विक्री तसेच वाहतूक करताना आढळून आल्यास स्थानिक पातळीवर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व यंत्रणा यांना तक्रार करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.  नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता या माशांचे संवर्धन व सेवन करू नये असे आवाहन करत जनआरोग्य लक्षात घेता जिल्ह्य़ातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित यंत्रणांना पत्र देऊन मांगूर माशाच्या बंदी संदर्भात करण्यात येणारी कार्यवाही  याबाबत तातडीने कळविण्यात येणार आहे, अशीही माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील यांनी बोलताना दिली.

गुन्हे दाखल

* भिवंडी येथे अशाच मांगूर माशाचे संवर्धन सुरू असल्याचे कळल्यानंतर तिथे असलेला बेकायदा मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला. या माशाची शेती करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*  हा काळा मांगूर मासा स्वस्त दराने सहजरीत्या विकत मिळत असल्याने सर्वसामान्य व याचे सेवन करणारे नागरिक ते खरेदी करत आहेत, मात्र त्याचे दुष्परिणाम याबाबतची माहिती नागरिकांना नाही.

* हा मांगूर मासा जिल्ह्य़ातही सहजरीत्या काही व्यक्तींमार्फत आणला जातो व तालुक्याच्या प्रमुख ठिकाणाच्या बाजारपेठांमध्ये तसेच परराज्यातून आलेल्या व त्यांची वस्ती असलेल्या ठिकाणी मांगूर माशाची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते.