आज सावंतवाडी या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी कोकणवासीयांशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजपावर जोरदार टीका केली. देशात पाशवी बहुमताचं सरकार नको आहे. त्यापेक्षा आपलं इंडिया आघाडीचं मिलीजुली असलेलं सरकार चालेल. आम्हीही २५ ते ३० वर्षे तुमच्या बरोबर होतो. आम्हाला काहीतरी चांगलं होईल वाटलं होतं. पण तसं काही झालंच नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी टरबूज असा केला आणि पुन्हा येईनच्या घोषणेवरुन त्यांना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

का म्हणाले उद्धव ठाकरे?

“मोदींनी सत्तेच्या हव्यासापोटी भाजपा संपवून टाकला. कारण नसताना विरोधी पक्षाला संपवायला निघाले आहेत. बाजारबुणगे, गद्दार, भेकड माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली आहेत. या भेकडांची फौज घेऊन माझ्यावर चाल करत आहात? तुमचा पक्ष शिल्लक राहिलाय कुठे?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सावंतवाडीत विचारला. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईनच्या घोषणेवरही कडाडून टीका केली.

देवेंद्र फडणवीस आधी टरबूज होते आता..

“देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. ते आता पाव उमुख्यमंत्री झाला आहात. पुन्हा येईन, पुन्हा येईनच्या घोषणा करताना टरबूज आणि आता झालेत चिराट. तरीही तुम्ही फोडाफोडीचे धंदे करत आहात. मी आजारी होतो, हालचाल करु शकत नव्हतो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळरात्रीच्या करामती केल्या त्यात तुमचा पक्ष संपलाय. माझी शिवसेना वाढली आणि फोफावली आहे. जिथे जातो आहे तिथे लोक येत आहेत. मुस्लीम लोकही रायगड दौऱ्यात बरोबर आले होते. यांचं हिंदुत्व वेगळं हे धर्मा-धर्मांमध्ये आगी लावणारं हिंदुत्व नाही हे त्यांनाही कळलं आहे. आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे. तुमचं हिंदुत्व हे आगी लावणारं आहे.” अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हे पण वाचा- उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याचा अनंत गीते यांना फायदा किती ?

माझी ताकद माझ्यासमोर बसलेली जनता आहे

मी संवाद दौरा सुरु केला आहे तो आपल्या लढ्यासाठी. मी ही लढाई तुमच्या भरवशावर लढतो आहे. अजूनही भाजपाला कळत नाही या उद्धव ठाकरेचा पक्ष फोडला, चोरला, धनुष्य-बाण चोरला. तरीही हा उभा कसा? कारण माझं कवच तुम्ही सगळी जनता आहात. हे माझं घराणेशाहीचं वडिलोपार्जित कवच आहे आणि मी घराणेशाहीची वारसा घेऊनच पुढे जातोय असंही उद्धव ठाकरे म्हणाले. जोपर्यंत जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत असे कितीही गद्दार आले तरीही त्यांना तुम्ही चिराटासारखं फोडून टाकाल याची मला खात्री आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray called devendra fadnavis tarbuj and criticized him in sawantwadi speech scj
First published on: 04-02-2024 at 14:16 IST