राज्यात खळबळ उडवणाऱ्या अहमदनगरच्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणात उच्च न्यायालयात खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँडव्होकेट उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निकालाविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने बाजू लढविण्यासाठी नगर जिल्हा पोलिस प्रशासनाने ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यासंबंधीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविला होता.त्यास अनुसरून,विधी व न्याय विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार यादव यांची या खटल्यात बाजू मांडण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

sanjay raut devendra fadnavis (9)
“मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचा…”, संजय राऊतांची खोचक टीका
Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
wardha lok sabha seat, Sushma Andhare, BJP MP Ramdas Tadas Family, Injustice Towards Daughter in law, Pooja Tadas, Demands Justice, pm narendra modi, modi Wardha Meeting, bjp,
पंतप्रधान मोदी साहेब पीडित पूजा तडस तुमचा परिवारात नाही का? सुषमा अंधारे म्हणाल्या…
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

13 जुलै 2016 रोजी कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 15 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. मराठा समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करून आरोपींना फांशीची शिक्षा देण्याची मागणी करीत संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर मोर्चे देखील काढण्यात आले होते.