मशालीच्या तेजाने जुमलेबाजी आणि भ्रष्ट राजवट जळून खाक होईल याची मला खात्री आहे. पोटनिवडणुकीत मशालीचा विजय झाला आहेच. आता मशाल घेऊन जात असताना नवं चिन्ह घेऊन जा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मशाल या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं तसंच शिवसेनेचं गीतही लाँच करण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होतील

महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होतील. जाहीरनामा किंवा वचननामा जो म्हणतात तो देखील आम्ही आणणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लीम लिग वगैरे काहीही म्हणू शकतात कारण जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लिगशी युती केली होती. काँग्रेस तेव्हा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेला पक्ष होता मोदींना ते माहीत आहे त्यामुळे त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील असाही टोला उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मोदी मिडल इस्टला जाऊन मशिदीत गेले होते, मोहन भागवत यांनी मुस्लिमांना जाऊन भेट घेतली होती त्याचा अर्थ काय होतो?

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडाफोडीवरुन अमित शाह यांना टोला, देवेंद्र फडणवीसांना म्हणाले ‘चेलेचपाटे’

मोदी आणि अमित शाह यांना फिरु द्या

सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांचं बिंग फुटलं. तसंच परकला म्हणून जे आहेत त्यांनी तर या प्रकरणाला मोदीगेट नाव दिलं होतं. हा सर्वात मोठा घोटाळा आहे. असा आरोप पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी केला आहे. मोदी आणि अमित शाह यांना दोन महिने फिरु द्या. दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी काय काय केलं नाही ते पाहुद्या, लोकांचं म्हणणं ऐकू द्या. त्यांच्याकडे आता दोनच महिने उरले आहेत. त्यानंतर चित्र बदलेलं असेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकणार

लोकसभेची लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू. ४५+ हा भाजपाचा देशातला आकडा आहे. आम्ही महाराष्ट्रात आम्ही ४८ जागा जिंकू असं सांगत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे. धूळ गोळा करणारा व्हॅक्युम क्लिनर असतो तसी भाजपा हा पक्षही भ्रष्टाचारी गोळा फिरतो आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will win all 48 seats in loksabha election said uddhav thackeray scj