समुद्रातील दुर्मिळ जातींपैकी व्हेल शार्क मासा शहरातील मुरुगवाडा येथील किनाऱ्यावर गुरूवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आला. किनाऱ्यावर येण्यापूर्वीच तो मृत झाल्याचे शवविच्छेदनातून पुढे आले आहे.

अरबी समुद्रात उठलेल्या चRीवादळामुळे खोल पाण्यातील मासे किनारी भागाकडे वळू लागले आहेत. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मिरकरवाडा बंदराजवळील मुरुगवाडा येथील कस्टमच्या फ्लोटिंग जेट्टीसमोर तेरा फूट लांबीचा आणि दीड टन वजनाचा मासा लाटांमधून वाहत किनारपट्टीवर आला. तेथे नौकांवर काम करणाऱ्या खलाशांनी मासा पाहिल्यावर याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्या वेळी त्याच्यामध्ये थोडी धुगधुगी होती, पण थोडय़ाच वेळात तो मरण पावला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याला समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरु होते. समाजमाध्यमांवर ही माहिती पसरल्यानंतर मुरुगवाडा येथे मासा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. तोपर्यंत वन विभाग, मत्स्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

nagpur lok sabha marathi news, nagpur lok sabha latest marathi news
नागपूर: मतदारांनो तुम्हीच जबाबदार, जिल्हा प्रशासनाचा अजब दावा
vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा

रत्नागिरी पंचायत समितीचे पशु वैद्यकीय अधिकारी अभिजित कसालकर यांनी माशाचे शवविच्छेदन केले. तेरा फूट लांबीच्या या व्हेलचे वय आठ ते नऊ वर्षे असून त्याचा एक डोळा निकामी झाला होता. तसेच तोंड, शेपटी आणि एका पंखालाही किरकोळ दुखापत झाली होती. त्याचा मृत्यू किनाऱ्यावर येण्यापूर्वीच झाला असावा, असा अंदाज आहे . पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तो खोल समुद्रातून किनाऱ्याकडे वाहत आला.

देवमुशी, वाघबीर असे त्या माशाचे प्रचलीत नाव आहे. तो दुर्मिळ जातींपैकी एक असल्याने वाईल्डलाईफ प्रोटेक्शन अ‍ॅक्ट अंतर्गत त्या माशाला संरक्षण देण्यात आले आहे. वन अधिकारी प्रियंका लगड यांनी सांगितले की, किनाऱ्यावर आढळलेल्या या माशाचा मृत्यू नैसर्गिक आहे. भक्ष्य न मिळाल्याने तो उपाशी राहिल्याचे आढळून आले आहे. वन विभागाच्या नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.