लातूरमध्ये वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून शीतल वायाळ या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच सोलापुरमध्ये हुंडाबळीची विदारक घटना घडली आहे. सोलापूरच्या मोहोळ येथे हुंड्याच्या जाचाला कंटाळून शहनाज मुलाणी या विवाहितेने आत्महत्या केली. सासरच्यांनी शहनाजकडे गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरच्यांकडून एक लाख रूपये आण, असा तगादा लावला होता.

शहनाज मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम गावची रहिवासी होती. ५ मे २०१५ रोजी सोलापूरमधील बार्शीतल्या शकील मुलाणीसोबत तिचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर शहनाजचा पैशांसाठी छळ होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी तिचा पती शकील मुलाणीसह सासू, सासरे आणि दीर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी शहनाजकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून १९ एप्रिलला शहनाजने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यानंतर २० तारखेला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.