संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणार ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच काही दिवसांपूर्वी पार पडला. पण, भारतात या सोहळ्यापेक्षा चर्चा झाली ती देसी गर्ल प्रियंका चोप्राची. या सोहळ्यासाठी प्रियंका चोप्रानं डीपनेक गाऊन परिधान केला होता. यावरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. प्रियंका चोप्राला ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री हिना खाननं फटकारलं आहे. त्याचबरोबर “ट्रोल करणाऱ्यांनी फक्त दहा मिनिटांसाठी ‘तो’ ड्रेस घालून दाखवावा,” असं खुलं आव्हानचं तिनं आहे.
मागील आठवड्यात ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रानं पती निक जोनासोबत हजेरी लावली होती. या खास कार्यक्रमासाठी प्रियांकाने डीपनेक असलेला गाऊन परिधान केला होता. मात्र ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगला सामोर जावं लागलं. अनेकांनी तिला ट्रोल केलं. दरम्यान, प्रियंकाला ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्री हिना खाननं संताप व्यक्त केला.
एका दूरचित्रवाणीला हिना खाननं मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिनं याविषयावर आपली भूमिका मांडली. हिना म्हणाली, “एखाद्या व्यक्तीला तिनं परिधान केलेल्या कपड्यांमध्ये व्यवस्थित वाटतं असेल, तर तिच्या कपड्यांवर टीका करणारे तुम्ही कोण आहात?, हेच मला कळत नाही. ट्रोल करणाऱ्यांना हे मी बोलले. प्रियंकानं जो ड्रेस परिधान केला होता, टीका करणाऱ्यांनी तो फक्त दहा मिनिटं घालून दाखवावा. तो परिधान करणं इतकं सोपं नाही. ते गंमत करण्याइतकं सोपं नाही. परिधान करून पोझ देण्याइतका सोपा हा पोशाख नाही. हे खूप अवघड आहे. असा ड्रेस घालायचा म्हणजे तुमच्याकडं खूप मोठं धैर्य असावं लागतं,” असंही हिनानं ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.
प्रियंकाची आई काय म्हणाली होती?
या ड्रेसवरून प्रियंकाला ट्रोल करण्यात आल्यानंतर तिची आई मधू चोप्रा यांनी आपलं मत मांडलं होतं. “जे झालं त्याचा मला आनंदच आहे. यामुळे माझी मुलगी अधिक सशक्त झाली आहे. प्रियांका तिच्या मनानुसार आयुष्य जगते. जोपर्यंत ती इतर कोणाला त्रास देत नाही किंवा इजा पोहचवत नाही तोपर्यंत तिने हवं तसं जगण्यात मला काहीच चुकीचं वाटत नाही,” असं मत मधू चोप्रा यांनी म्हटलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2020 2:00 pm