News Flash

टायगर श्रॉफची आई संतापली, अनुराग कश्यपला मागावी लागली माफी

जाणून घ्या कारण...

सध्या बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप वादग्रस्त विधानांनमुळे चर्चेत आहे. तो सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधताना दिसत आहे. तसेच कंगना देखील त्याला सडेतोड उत्तर देण्यात मागे नाही. त्या दोघांमधील भांडणादरम्यान अनुराग कश्यपने असे काही ट्विट केले की त्याला टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांची माफी मागावी लागली आहे.

अनुराग कश्यपने नुकताच एक ट्विट रिट्विट केले आहे. ज्या ट्विटमध्ये टायगर श्रॉफ आणि तैमूर असल्याचे दिसत आहे. तैमूर आणि टायगरचा फोटो शेअर करत ‘हा मीडियाने पसरवलेला घराणेशाही वाद आहे का? कारण मीडिया देखील अशा गोष्टी दाखवते ज्या प्रेक्षकांना पाहायला आवडतात. त्यामुळे हा मीडिया आणि प्रेक्षकांकडून पसरवला जाणारा घराणेशाही वाद नाही?’ असे म्हटले होते.

अनुरागचे ट्विट पाहून टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लगेच ट्विट करत अनुरागला उत्तर दिले आहे. ‘कृपया माझ्या मुलांना यामध्ये खेचू नको. ते त्यांच्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचले आहेत’ असे आयशा यांनी म्हटले.

आयशा यांचे ट्विट पाहून अनुरागने लगेच माफ मागितली आहे. मला माफ कर आयशा. मला असे म्हणायचे नव्हते. मीडिया नेहमी तैमूर बाबत सांगत असते असे मला म्हणायचे होते. जर मी तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून सॉरी असे अनुरागने ट्विटमध्ये म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या होत्या. त्यामुळे बॉलिवूडमध्ये घराणीशाही हा वाद पेटून उठला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 4:25 pm

Web Title: ayesha shroff reacted when anurag kashyap explained nepotism using tigers example avb 95
Next Stories
1 Video : नवोदितांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवायला हवा- अक्षय इंडीकर
2 “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर
3 या वयातही फिट राहण्यासाठी धर्मेंद्र करतायेत वर्कआऊट, पाहा व्हिडीओ
Just Now!
X