19 October 2019

News Flash

माझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर

झरीन खानने एका मुलाखतीत आपला अनुभव शेअर केला आहे

अभिनेत्री झरीन खान सध्या तिच्या आगामी पंजाबी चित्रपट ‘डाका’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून पदार्पण करणारी झरीन खान आता बॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. मात्र जेव्हा ती चित्रपटसृष्टीत नवखी होती तेव्हा तिलाही काही अभिनेत्रींप्रमाणे कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. Pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत झरीन खानने आपला तो अनुभव शेअर केला आहे.

एकदा एका दिग्दर्शकाने झरीन खानला संकोचलेपणा घालवण्यासाठी त्याच्यासोबत किसिंग प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं. “ती व्यक्ती मला सारखं सांगत होती की, तुला तुझा संकोचलेपणा घालवण्याची गरज आहे. त्यावेळी मी चित्रपसृष्टीत एकदम नवखी होते,” असं झरीन खानने सांगितलं आहे. यानंतर त्याने मला त्याच्यासोबत किसिंग सीनचा सराव करण्यास सांगितलं. त्यावर मी त्याला मी अशी कोणतीही गोष्ट करणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं असल्याचं झरीनने म्हटलं आहे.

याआधी झरीन खान आपल्या वजनामुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. यावरुन अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र झरीन खानने अशा ट्रोलर्सना नेहमी उत्तर दिलं आहे.

First Published on September 17, 2019 5:13 pm

Web Title: bollywood actress zareen khan shares experience of casting couch sgy 87