बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारसाठी मागची काही वर्षे फार खास राहिली नाहीत, कारण त्याचे चित्रपट सातत्याने फ्लॉप होत आहेत. त्याचा नुकताच आलेला ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता. आता फ्लॉपचा सामना करणाऱ्या अक्षयने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले होते. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.

अक्षयचा असाच एक चित्रपट २००७ मध्ये आला होता. या चित्रपटाचं बजेट फक्त ३० कोटी होतं, पण त्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या या चित्रपटात दोन-तीन नव्हे तर तब्बल १५ अभिनेत्री होत्या. या चित्रपटात रितेश देशमुख व फरदीन खानही महत्त्वाच्या भूमिकेत होते.

Karsandas Mulji journalist praised by Modi Netflix Maharaj film controversy
आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुलजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?
Marathi Film Festival during July 2728 in California
कॅलिफोर्नियामध्ये २७२८ जुलै दरम्यान मराठी चित्रपट महोत्सव
aishwarya narkar favorite actor arun sarnaik (1)
ऐश्वर्या नारकर ७० च्या दशकातील ‘या’ मराठी अभिनेत्याच्या आहेत चाहत्या, आवडता चित्रपट अन् गाणं जाणून घ्या…
Cannes International Film Festival All We Imagine As Light movie
आनंददायी कानपर्व
Cannes Film Festival
‘‘…तर भूमिकेचा आत्मा सापडतो’’
The actress who won an award at the Cannes Film Festival denied the kerala story film
कान फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने नाकारला होता ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; म्हणाली, “जर मला काम…”
“…असं मुस्लीम कुटुंब दाखवा अन् ११ लाख जिंका”, ‘त्या’ हिंदी चित्रपटावरील वादानंतर जितेंद्र आव्हाडांची घोषणा
kan award
पायल कपाडियाची ऐतिहासिक कामगिरी; ‘कान’मध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ला ‘ग्रां प्री’ पुरस्कार

‘हीरामंडी’ व ‘शैतान’नंतर या आठवड्यात OTT वर येणार ‘हे’ जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वाचा यादी

जबरस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘हे बेबी’ नावाचा हा चित्रपट २००७ साली आला होता. या चित्रपटात अक्षय कुमारसह रितेश देशमुख आणि फरदीन खान मुख्य भूमिकेत होते. ‘हे बेबी’ हा त्यावर्षी हिट ठरलेल्या काही मोजक्या मोठ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाचे एकूण बजेट फक्त ३० कोटी रुपये होतं आणि या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल ८४ कोटी रुपयांची कमाई केली होती.

सत्य घटनांवर आधारित ‘हे’ K-Drama ओटीटीवर आहेत उपलब्ध; घरबसल्या पाहता येणार रोमान्स, सस्पेन्स अन् थ्रिलरचा मिलाफ

कोण होत्या त्या १५ अभिनेत्री?

‘हे ​​बेबी’ चित्रपट न पाहणारे खूप कमी लोक असतील. एक खास गोष्ट म्हणजे या सिनेमात एक-दोन नव्हे तर तब्बल १५ अभिनेत्री होत्या. यात विद्या बालन, मलायका अरोरा, सेलिना जेटली, मिनिषा लांबा, अमृता राव, तारा शर्मा, नेहा धुपिया, दिया मिर्झा, अमीषा पटेल, सोफी चौधरी, मासुमेह मखीजा, कोयना मित्रा, रिया सेन, अमृता अरोरा आणि शमिता शेट्टी मुख्य भूमिकेत होते.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

शाहरुख खानने केला होता कॅमिओ

या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री विद्या बालन होती, पण ‘हे बेबी’ च्या मुख्य गाण्यात तब्बल १४ अभिनेत्रींनी कॅमिओ भूमिका केल्या होत्या. विद्या बालन ‘हे बेबी’ मध्ये मुख्य अभिनेत्री होती, पण चित्रपटात तिची एन्ट्री इंटर्व्हलनंतर झाली होती. मात्र, विद्या बालनने आपल्या पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटात १४ अभिनेत्रींशिवाय बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने ‘हे ​​बेबी’ मध्ये कॅमिओ केला होता. या चित्रपटातील एका गाण्यात तो दिसला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता, आजही अनेकांचा तो आवडता चित्रपट आहे.