बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंह. आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रांगदाने अनेकांची मनं जिंकली आहेत. लवकरच ती अभिनेता अभिषेक बच्चनसोबत बॉब बिस्वासमध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अलिकडेच चित्रांगदाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने महाविद्यालयीन जीवनातील काही कटू आठवणींना उजाळा दिला आहे.

कॉलेजमध्ये असताना चित्रांगदाला रॅगिंगसारख्या कटू घटनांनासामोरं जावं लागलं होतं.याविषयी बोलत असताना तिला कॉलेजमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायला भाग पाडलं होतं याविषयी तिने सांगितलं.

“माझा मॉडेलिंग क्षेत्रातील प्रवास काही फार सोपा नव्हता. कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षात मला रॅगिंगला सामोरं जावं लागलं. आम्हाला उलटा सलवार परिधान करायला सांगितला, केसांना प्रचंड तेल लावायला सांगितलं आणि एका बादलीत सगळी पुस्तक टाकून त्या अवस्थेत रॅम्पवॉक करायला लावला. खरंतर हा माझा पहिलाच रॅम्पवॉक होता.त्यामुळे मी प्रामाणिकपणे तो केला आणि त्यानंतर कॉलेजच्या फॅशन टीमचा एक भाग झाले”, असं चित्रांगदा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “मला काही मुलींच्या मॉडेलिंगविषयी माहिती मिळाली होती. ज्या याच क्षेत्रात काम करत होत्या. या मुलींच्या मदतीने मी माझा पोर्टफोलियो शूट केलं. त्यानंतर माझ्या नावाची चर्चा सगळीकडे होऊ लागली. या काळात मी एका जाहिरातीसाठी ऑडिशन दिलं पण त्यात मला रिजेक्ट करण्यात आलं. परंतु, योगायोगाने गुलजार सरांनी मला पाहिले आणि त्यांच्यामुळे मला सनसेट पॉइंट या म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. या अल्बमची निर्मिती त्यांच्या मुलीने म्हणजेच मेघना गुलजार यांनी केली होती.”

दरम्यान, चित्रांगदा लवकरच ‘बॉस बिस्वास’ या चित्रपटात म्हत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट ‘बॉब बिस्वास’ यांच्या जीवनावर आधारित आहे. २०१२ मध्ये आलेल्या ‘कहानी’ या विद्या बालनच्या चित्रपटात ‘बॉब बिश्वास’ हे काल्पनिक पात्र तयार करण्यात आलं होतं. याच पात्रावर आधारित ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतं. ‘कहानी’ या चित्रपटात बॉब बिस्वास नावाचा एक कॉन्ट्रॅक्ट किलर होता. ही भूमिका श्वाश्वत चटर्जीने साकारली होती.