७५ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला दणक्यात सुरूवात झाली. या सोहळ्यात हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आवर्जुन उपस्थिती लावली. मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारावर आपले नाव कोरणं हे हॉलिवूड कलाकारांचे स्वप्नच असतं. अँजेलिना जोलीसह निकोल किडमनपर्यंत अनेकजण या सोहळ्यात आपल्या अनोख्या अंदाजात वावरताना दिसले. छोट्या पडद्याचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक नॉर्मन लीयर आणि ‘वेस्ट साइड स्टोरी’ची अभिनेत्री रीटा मोरेनो यांनी सोहळ्यात हटके एण्ट्री घेतली. दोघांनीही लाल स्कूटीवरुन पुरस्कार सोहळ्यात प्रवेश केला. त्यांच्या या हटके एण्ट्रीचीच चर्चा सोहळ्यात पाहायला मिळाली.

Salman Khan firing case marathi news, Lawrence Bishnoi gangster arrested marathi news
सलमान खान गोळीबार प्रकरण : हरियाणातून लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाला अटक
Charlotte Chopin
१०१ व्या वर्षीही शिकवतात योग प्रयोग; फ्रेंच शिक्षिकेचा भारताकडून पद्मश्री पुरस्काराने गौरव
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
90s filmfare award show viral video
90’s चे सिनेस्टार! नव्वदच्या दशकातील फिल्मफेअर पुरस्काराचा VIDEO व्हायरल, नेटकरी म्हणाले, “हा बॉलीवूडचा सुवर्णकाळ..”
cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट
Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Riteish Deshmukh post for brother father in law
आमदार भावाच्या सासऱ्यांसाठी रितेश देशमुखची खास पोस्ट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीच्या ड्रेसकोड काळ्या रंगाचा होता. त्यामुळेच अधिकतर कलाकार काळ्या रंगाच्या कपड्यांमध्येच आले होते. यौन शोषणाविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतीक म्हणून सोहळ्याचा ड्रेस कोड काळ्या रंगाचा ठेवण्यात आला होता. ‘ब्यूटी अॅण्ड द बीस्ट’ फेम अभिनेत्री एमा वॉटसन ‘इम्कान’ सिनेमाचा एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर Marai Larasi सोबत आली होती.

‘लिमिटेड सिरिज’ आणि ‘मोशन पिक्चर्स टेलिव्हिजन’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निकोल किडमॅनला सन्मानित करण्यात आले. निकोलला हा पुरस्कार तिच्या ‘बिग लिटिल लाइस’ यातील भूमिकेसाठी मिळाला. सॅम रॉकवेलला ‘थ्री बिलबोर्ड आउटसाइड एबिग, मिसौरी’ सिनेमातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार मिळाला. अँजेलिना जोलीही तिच्या मुलासोबत या पुरस्कार सोहळ्याला आली होती.

राशेल ब्रोसनाहनला ‘द मावलस मिसेस मायझेल’ या विनोदी मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज ड्रामाचा पुरस्कार ‘दी हँडमेट्स टेल’ला मिळाला. आश्चर्य म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिका या शर्यतीतच नव्हती.

एलिजाबेथ मोजला तिच्या ‘द हँडमेट्स टेल’ या मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. ‘थ्री बिलबोर्ड आउटसाइड एबिग, मिसौरी’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चरचा पुरस्कार मिळाला.