News Flash

लग्नाच्या ३ महिन्यानंतर गौहर खान प्रेग्नंट?, अभिनेत्रीने केला खुलासा

प्रेग्नंसीच्या चर्चांवर गौहर खानने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने २५ डिसेंबर रोजी दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केले. त्यांच्या लग्नातीला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर गौहरने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. चित्रीकरणासाठी ती लखनऊला गेली होती. चित्रीकरण संपल्यानंतर ती झैदसोबत उदयपुरला हनीमूनसाठी गेली. आता गौहर खान प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा झैदने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे सुरु झाल्या होत्या. खुद्द गौहर खानने यावर वक्तव करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

गौहरचा पती झैदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये झैद कोणी तरी येणार असे बोलताना दिसत आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करत झैदने, ‘हे कन्फर्म आहे, आमच्यामध्ये आता एक नवा अतरंगी येणार आहे. या सर्वांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हाला काय वाटते? कोण असू शकते? कमेंट करुन सांगा’ या आशायचे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaid Darbar (@zaid_darbar)

झैदने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत गौहर प्रेग्नंट आहे? असे म्हटले आहे तर दुसऱ्या एका यूजरने तुमच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे का? असा प्रश्न विचारला आहे.

सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या या चर्चांवर गौहर खानने वक्तव्य करत पूर्ण विराम दिला आहे. तिने ‘तुम्हाला वेड लागले आहे का? मी माझ्या वडिलांना नुकतेच गमावले आहे. त्यामुळे एखाद्या विषयी काही लिहिताना विचार करा.. मी प्रेग्नंट नाही. धन्यवाद’ या आशयाचे ट्वीट गौहर खानने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 4:22 pm

Web Title: is after 3 month of wedding gauahar khan pregnant avb 95
Next Stories
1 २०२४मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार, कंगना रणौतने केलं ट्विट
2 अमिताभ बच्चन यांना ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
3 पाठक बाईंचा भन्नाट डान्स, मैत्रिणींसोबत अक्षयाची धमाल
Just Now!
X