छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे आई माझी काळुबाई. आर्याची भक्ती आणि काळुबाईची शक्ती यांच्यावर भाष्य करणारी ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर पोहोचली आहे. अनेक संकटांचा सामना करणाऱ्या आर्याला देवी काळुबाई प्रत्येक पावलापावलावर मदत करत आहे. मात्र, आर्यावर लवकरच मोठं संकट कोसळणार आहे.
आर्या आणि अमोघची मैत्री होत असतानाच पाटील वाड्यात सई म्हणजे अमोघच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसी येते आणि त्यामुळे घरातली सगळी गणित बदलली आहेत. अमोघ आणि सई यांच्या नात्यात अंतर वाढत आहे. सईदेखील विराटप्रमाणेच आर्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे क्रिक्रांतीच्या दिवशी विराटची ताकद वाढणार असून तो आर्याचा अंत करण्याचा प्रयत्न करणार आहे.
१७ जानेवारी रोजी आई माझी काळुबाई या मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे. या भाग आर्यावर कोसळणारं संकट दाखवण्यात येणार आहे. विराट आर्याचा अंत करण्यासाठी योजना आखत आहे. मात्र, तो त्याच्या या कटकारस्थानात यशस्वी होतो का?, या संकटातून देवी काळुबाई आर्याचं रक्षण करेल का? ही सगळी उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या प्रेक्षक आतुर झाले आहेत. मात्र, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 16, 2021 4:00 pm