News Flash

संगीतकार वाजिद यांची पत्नी मालमत्तेच्या वादामुळे न्यायालयात

वाजिद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेवरून तिच्यात आणि वाजिद यांच्या कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला होता.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या वर्षी करोनाच्या संसर्गांमुळे निधन झालेले संगीतकार वाजिद खान यांची पत्नी माहरूख हिने मालमत्तेच्या वादातून दीर साजिद आणि सासूविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

वाजिद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेवरून तिच्यात आणि वाजिद यांच्या कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला होता. वाजिद यांच्या मालमत्तेवर त्यांच्या मुलांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांची मालमत्ता अन्य कोणाला विकण्यापासून त्यांचा भाऊ आणि आईला मज्जाव करावा, अशी मागणी माहरूखने केली आहे.

न्यायालयाने तिच्या याचिकेची दखल घेत साजिद आणि त्यांच्या आईला नोटीस बजावली आहे. याबाबत २१ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

माहरूखच्या दाव्यानुसार, वाजिद यांनी २०१२ मध्ये मृत्यूपत्र तयार केले होते. त्यात त्यांनी त्यांच्या नावे असलेली मालमत्ता तिच्या आणि मुलांच्या नावे केली होती. त्यामुळे वाजिद यांचे हे मृत्युपत्र कायदेशीररीत्या मान्य केले जावे, अशी मागणीही तिने याचिके द्वारे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:54 am

Web Title: musician wajid wife in court over property dispute abn 97
Next Stories
1 करोनातून बरी झाल्यावर भूमी पेडणेकर झाली करोना योद्धा; म्हणाली, “या लढाईत हे …”
2 “तो आता घरात आलाय”; स्वरा भास्करचं ट्विट
3 “सलमान खान आमच्यासाठी देवदूतच!” राखी सावंतच्या आईने मानले सलमानचे आभार
Just Now!
X