News Flash

‘माझ्या आईसाठी कृपया प्रार्थना करा’, हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत राखी म्हणाली

चाहत्याने राखीच्या खासगी आयुष्यात इतक्या अडचणी असूनही ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते असे म्हटले आहे

‘माझ्या आईसाठी कृपया प्रार्थना करा’, हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत राखी म्हणाली

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस १४’मध्ये अभिनेत्री राखी सावंत सहभागी झाली होती. तिने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. बिग बॉस १४च्या फिनालेमध्ये राखी सावंतचा भाऊ राकेशने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने आई ICUमध्ये असल्याचे सांगितले होते. आता राखीने सोशल मीडियावर आईचा फोटो शेअर करत माझ्या आईसाठी प्रार्थना करा असे म्हटले आहे.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझ्या आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हा फोटो पाहून चाहते भावूक झाले आहेत. एका चाहत्याने राखीच्या खासगी आयुष्यात इतक्या अडचणी असूनही ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती असे म्हणत कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

बिग बॉसच्या घरात राखी सावंतने व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटाचा सामना करत असल्याचे सांगितले होते. पण घरातील इतर स्पर्धकांनी तिची ही गेम खेळण्याची पद्धत असल्याचे म्हटले होते. पण तसे नव्हते. खऱ्या आयुष्यात राखीची आई कॅन्सरशी लढा देत असल्याचे समोर आले आहे.

‘बिग बॉस १४’च्या घरात राखी सावंतने चॅलेंजर म्हणून एण्ट्री केली होती. राखीने बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. त्यानंतर तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे मिळालेले पैसे आईच्या उपचारासाठी वापरणार असल्याचे राखीने फिनालेमध्ये म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:37 pm

Web Title: rakhi sawant shares heartwrenching pics of her mother avb 95
Next Stories
1 नेमकं काय आहे ‘८ दोन ७५’चं रहस्य?; उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित
2 ‘गंगूबाई काठियावाडी’चं नवं पोस्टर, आलिया भट्टने शेअर केला लूक
3 शिल्पा शेट्टी देखील करते ‘पावरी’, पतीसोबत शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Just Now!
X