News Flash

सलमान विकणार ‘फ्रेश’ सॅनिटायझर; फॉर्म हाऊसवरुनच केली नव्या ब्रॅण्डची घोषणा

सलमानचा नवा उद्योग; लॉकडाउनमध्ये विकतोय 'फ्रेश' सॅनिटायझर

देशभरात लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउनमुळे लोक आता वैतागले आहेत. परंतु बॉलिवूडचा भाईजान सलमान खान मात्र या लॉकडाउनमध्ये चाहत्यांना सरप्राईजवर सरप्राईज देत चालला आहे. अलिकडेच त्याने आपले एक युट्यूब चायनल सुरु करुन प्रेक्षकांना चकित केले होते. त्यानंतर आता तो चक्क सॅनिटायझर विकताना दिसत आहे.

सलमानने ‘फ्रेश’ (FRSH) नावाची एक कंपनी सुरु केली आहे. या कंपनीचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण, सौदर्य प्रसाधने अशा प्रकारचे अनेक प्रोडक्ट लवकरच बाजारात येतील. परंतु सध्या करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सलमान केवळ सॅनिटायझरची विक्री करत आहे. या कंपनी बाबत अधिक माहिती देण्यासाठी सलमानने एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

सलमान सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. अलिकडेच त्याची दोन गाणी सोशल मीडियावर प्रदर्शित झाली होती. या गाण्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर सलमानच्या फ्रेश कंपनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 3:20 pm

Web Title: salman khan launch new brand frsh starts with sanitisers mppg 94
Next Stories
1 “माझा फोटो कुख्यात गुंडासोबत दाखवला कसा?”; ‘पाताल लोक’ पाहून भाजपा आमदार संतापला
2 देवोलिनाला बसला ट्रोल करण्याचा फटका; अभिनेत्याने केला सायबर क्राइमचा आरोप
3 “लॉकडाउननंतर चित्रीकरणाचा खर्च वाढणार”; दिग्दर्शकाने व्यक्त केली चिंता
Just Now!
X