News Flash

समंथाला होतं अभ्यासाचं वेड; १०वीचा रिझल्ट होतोय व्हायरल

नागार्जुनाची सुन अभ्यासातही होती हुशार

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशवासीयांचे जीवन विस्कळीत झाले आहे. इतर व्यवसायांसोबतच विद्यार्थांचेही हाल होत आहेत. १०वीच्या विद्यार्थांच्या रिझल्टचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वातावरणात दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीचं १०ची गुणपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समंथा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक आघाडिची अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली जाते. मात्र अभिनयात तरबेज असलेली समंथा अभ्यासातही तितकीच हुशार होती. तिने आपल्या १०वीचा रिझल्ट सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. १०वी मध्ये असताना तिला १० विषयांमध्ये १००० पैकी चक्क ८८७ मार्क मिळाले होते. ही गुणपत्रिका २००२ ची आहे. त्यावेळी समंथा तिच्या शाळेतून पहिली आली होती.

समंथाने ट्विट केलेला हा रिझल्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी समंथा अभिनेत्री पूजा हेगडेमुळे चर्चेत होती. तिने अप्रत्यक्षपणे समंथावर टीका केली होती. या टीकेमुळे तिचे चाहते पूजावर संतापले होते. पूजाने समंथाची जाहीर माफी मागावी अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या विवादानंतर आता संमंथा तिच्या १०च्या निकालपत्रामुळे चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 12:27 pm

Web Title: samantha akkineni 10th result mppg 94
Next Stories
1 वजनदार सारा फिट कशी झाली?; पाहा व्हिडीओ
2 …तर आज आर. माधवन अभिनेता नसता
3 सनीने सांगितला इंटिमेट सीन शूटचा अनुभव; ‘त्यावेळी अनेकजण ….’
Just Now!
X