24 October 2020

News Flash

जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत असणारी ‘ती’ तरुणी आहे तरी कोण?

'ये लडकी मेरे रोम रोम मे बसती है' असं लिहित त्यानं हा फोटो शेअर केला होता. त्यामुळे या 'मिस्ट्री गर्ल'बद्दल अधिक कुतूहल वाढत गेलं.

नवाजच्या आगामी चित्रपटात व्हॅलेंटिनाचीदेखील भूमिका आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका तरुणीसोबत फोटो शेअर केला होता. त्यामुळे ही तरुणी आहे तरी कोण हे जाणून घेण्याचं कुतूहल चाहत्यांना होतं. विशेष म्हणजे ‘ये लडकी मेरे रोम रोम मे बसती है’ असं लिहित त्यानं हा फोटो शेअर केला होता. त्यामुळे या ‘मिस्ट्री गर्ल’बद्दल अधिक कुतूहल वाढत गेलं.

अखेर या ‘मिस्ट्री गर्ल’चा उलगडा झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतंच या तरुणीची ओळख सांगितली आहे. ही तरुणी इटालियन अभिनेत्री असून तिचं नाव व्हॅलेंटिना कॉर्टी आहे. नवाजच्या आगामी चित्रपटात व्हॅलेंटिनाचीदेखील भूमिका आहे. सध्या रोममध्ये या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू आहे त्यामुळे नवाजनं हा फोटो शेअर केला होता.

तनिष्ठा चटर्जीच्या चित्रपटात नवाज दिसणार आहे. त्यामुळे ही नवीन जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी नवाजचेही चाहते उत्सुक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 1:36 pm

Web Title: taran adarsh revealed that the mystery woman in nawazuddins photo is italian actress
Next Stories
1 Bigg Boss Marathi : आस्तादच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण माहित आहे का?
2 Bigg Boss Marathi : ‘या’ वादांमुळे बिग बॉस मराठी गाजलं
3 ‘त्या’ एका चुकीमुळे कार्तिक आर्यनला करणकडून डच्चू
Just Now!
X