News Flash

सोशल मीडियामुळे शिक्षिकेला मिळाली मुख्य नायिकेची संधी

"माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत आहे."

सोनाली पंडित

स्टार प्रवाह वाहिनीवर १० मार्च म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या वैजू नंबर वन मालिकेची सध्या कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत वैजूची भूमिका साकारणाऱ्या सोनाली पंडीतची मालिकेसाठी निवड हटके पद्धतीने झालीय. त्याच निमित्ताने सोनाली पाटीलशी साधलेला हा खास संवाद…

‘वैजू नंबर वन’ मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?

वैजूसाठी माझी निवड होणं ही स्वप्नवत गोष्ट आहे. खरंतर मी पेशाने शिक्षिका आहे. एम ए, बीएड आणि त्यानंतर एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर मी कोल्हापूरातील राजाराम ज्युनियर आणि सीनिअर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. याच आवडीमुळे सोशल मीडियावर मी माझे व्हिडिओज पोस्ट करायचे. मिनिटभराच्या व्हिडिओने जर इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमटत असेल तर ते करायला काय हरकत आहे असं मला वाटतं. याच दरम्यान वैजू नंबर वन मालिकेसाठी ऑडिशन्स सुरु होते. बऱ्याच अभिनेत्रींची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली होती. माझे व्हिडिओज पाहून मलाही ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं. इतक्या अनुभवी अभिनेत्रींमधून माझी निवड होईल असं वाटलंच नव्हतं. पण वैजू नंबर वनच्या टीमला माझ्यातली चुणुक दिसली आणि माझी निवड झाली. माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत आहे.

वैजू आणि सोनालीमध्ये काय साम्य आहे?

खरं सांगायचं तर वैजू आणि सोनाली वेगळ्या नाहीत. सोनालीमध्ये वैजूचे गुण आहेतच. वैजूची एनर्जी अफलातून आहे. ती सकारात्मक आहे. परिस्थीती कोणतीही असूदे त्यातून मार्ग काढण्याचं कौशल्य वैजूकडे आहे. वैजूमध्ये एक गुप्तहेर दडलेला आहे त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेमवर तिच्याकडे हटके सॉल्यूशन आहे. वैजूच्या या लॉजिक आणि मॅजिकमुळेच तर ती नंबर वन आहे. वैजूची ही भूमिका मी २४ तास जगते आहे. त्यामुळे सोनालीला वैजूपासून वेगळं करताच येणार नाही.

मालिकेच्या वेगळेपणाबद्दल काय सांगशील?

रोजच्या धकाधकीच्या जीवनात निरागस हास्य आणि निवांत क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. तुमच्या याच समस्येवर वैजू नंबर वन धमाल मनोरंजनाचं औषध घेऊन येणार आहे. होळीचा सण जसं संपूर्ण कुटुंब एकत्र घेऊन येतो अगदी त्याचप्रमाणे हे वैजू मालिकेतलं २२ खोल्यांचं कुटुंब तुमच्या भेटीला येणार आहे. तिसरी मंजिल चाळ नावाप्रमाणेच थोडी फिल्मी आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली मंडळी या तिसरी मंजिलमध्ये अगदी गुण्यागोविंदाने रहातात. टोलेजंग इमारतींच्या शहरात चाळसंस्कृती हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. चाळ हा प्रत्येकाच्या मनातला असा एक हळवा कोपरा आहे ज्याच्या आठवणी पुसणं हे केवळ अशक्य आहे. वैजू नंबर वन मालिकेतलं हे २२ खोल्यांच कुटुंब तुम्हाला नक्कीच निखळ मनोरंजन देईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 12:06 pm

Web Title: this woman got main role in marathi serial because of social media ssv 92
Next Stories
1 ‘बागी 3’ची ‘तान्हाजी’वर मात; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस
2 Photos: अरे कोण आहे कोण हा?
3 करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अक्षय कुमारने दिला सल्ला
Just Now!
X