19 September 2020

News Flash

#ShameOnKaranJohar :.. म्हणून करण जोहरवर भडकले नेटकरी

करणनं खापर तांत्रिक अडचणींवर फोडलं आहे

दिग्दर्शक करण जोहर #ShameOnKaranJohar या हॅशटॅगमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अनेकांनी करणवर नाराजी दर्शवली आहे. हा हॅशटॅग चर्चेत येण्याचं कारण म्हणजे  एका चाहत्यानं शाहरूखविरोधात केलेलं ट्विट करणनं अनावधानानं लाइक केलं. करणनं हे ट्विट लाइक केल्यानंतर अल्पावधित सोशल मीडियावर करणविरोधात वारे वाहू लागले.

ट्विटरवर एका चाहत्यानं शाहरूख खान विरोधात ट्विट केलं. या चाहत्यानं शाहरूख आणि अक्षयची तुलना होऊच शकत नाही असं लिहित शाहरूखला बी ग्रेड अभिनेता म्हटलं. हे ट्विट करणनं लाइक केलं. त्यानंतर करणविरोधात #ShameOnKaranJohar हा हॅशटॅश ट्रेंड होऊ लागला. शाहरूख आणि करणची घट्ट मैत्री आहे असं असताना करणनं  शाहरूखविरोधातील ट्विट लाइक केल्यानं अनेकांनी करणवर टीका केली आहे.

करणविरोधातील हॅशटॅग ट्रेंड होत असताना पाहून करणनं यावर स्पष्टिकरण दिलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे काहीतरी गडबड झाल्याचं करणनं म्हटलं आहे. लवकरच यावर मार्ग काढतो तोपर्यंत चुक झाली तर संभाळून घ्या असंही ट्विट त्यानं केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 4:15 pm

Web Title: why shame on karan johar hashtag is trending on twitter
Next Stories
1 फरहानसोबत शिबानी दांडेकरच्या अफेअरबद्दल बहिण अनुषा म्हणते..
2 ‘दया बेन’ला ‘तारक मेहता..’मध्ये परतण्यासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम
3 सूरज पांचोली ‘सॅटेलाइट शंकर’ची पूर्ण कमाई देणार लष्कराला
Just Now!
X