अभिनेत्री रकुल प्रीत सिंह पाठोपाठ करिश्मा प्रकाशदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. करिश्मा प्रकाश अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर असून ड्रग्स प्रकरणात तिचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे रकुल प्रीतसोबतच करिश्माचीदेखील एनसीबी चौकशी करणार आहे. ड्रग्सप्रकरणी करिश्मा प्रकाशचं नाव आल्यामुळे बुधवारी एनसीबीने तिला समन्स बजावले होते. त्यानंतर शुक्रवारी (२५ सप्टेंबर) ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्सच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. Mumbai: Karishma Prakash, actor Deepika Padukone's manager, arrives at NCB SIT office. She was summoned by Narcotics Control Bureau to join the investigation of a drug case, related to #SushantSinghRajputDeathCase. pic.twitter.com/hUvj5JfkA9 — ANI (@ANI) September 25, 2020 दरम्यान, एनसीबी सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांची चौकशी करत आहे. जया साहाच्या चॅटमधून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं उघड झाली आहेत. दीपिकाची मॅनेजर करिश्मा आणि जया यांच्यातदेखील ड्रग्सविषयी बोलणं झाल्याचं चॅटमधून उघडकीस आल्याचं म्हटलं जात आहे.