सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर सोहळा २०२१ अखेर पार पडला. लॉस एन्जेलेसमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा सोहळा व्हर्चुअल पद्धतीने पार पडला. यंदाच्या ऑस्करवर ‘नोमाडलँड’ या चित्रपटाने छाप सोडली. या चित्रपटातील अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

अभिनेत्री फ्रीडा पिंटोने इरफान खान यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. ‘इरफान खान यांच्यासारखं कुणीच नव्हतं. इरफान खान यांच्यासारखं कोणीच नव्हतं. त्यांचा अभिनय, व्यक्तिमत्व पाहून केवळ कौतुकच वाटलं नाही तर मलाही त्यांचं अनुकरण करण्याची इच्छा आहे’ असे फ्रीडा म्हणाली. तसेच इरफान यांचे ‘पानसिंग तोमर’, ‘लंच बॉक्स’, ‘मकबूल’ हे चित्रपट तिच्या हृदयाजवळ असल्याचे तिने म्हटले आहे.

ऑस्कर विजेत्यांची यादी:

सर्वोत्कृष्ट चित्रपट : ‘नोमेडलँड’
सर्वोत्कृष्ट अभिनेते : अँथनी हॉपकिंस (‘द फादर’)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमाडलँड)
सर्वोत्कृष्ट फिल्म् एडिटिंग : ‘साऊंड ऑफ मेटल’
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन: ‘मँक’
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : ‘मँक’
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : युन यू जंग
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट : ‘सोल’