‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत भूमिका साकारणाऱ्या इतर कलाकारांचीही करोना चाचणी करण्यात आली. तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक या सर्वांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. १५ सप्टेंबरपासून मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत शूटिंगला सुरुवात होईल. निवेदिता सराफ क्वारंटाइनमधून बाहेर आल्यानंतर शूटिंगसाठी उपस्थित राहतील. मालिकेच्या सेटवरील सर्वांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जात असल्याचं मालिकेच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं.
‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवरील २७ जणांना करोना
‘आई माझी काळूबाई’ या मराठी मालिकेच्या सेटवरील २७ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे. सेटवरील अनेकांना करोनाची लागण झाल्याने १५ सप्टेंबर रोजी मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली. या मालिकेची शूटिंग साताऱ्यामध्ये होत होती. मात्र आता मुंबईतील फिल्म सिटीमध्ये शूटिंग करण्यात येणार असल्याचं समजतंय.