बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या आगामी ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना आलिया जखमी झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र आलियाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच मला कोणतीही दुखापत झाली नसून ही जुनी जखम असल्याचं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. यामध्येच चित्रपटाच्या सेटवर आलिया जखमी झाल्याचं एक वृत्त वाऱ्यासारखं पसरतं होतं. या माहितीनंतर अनेकांनी तिला फोन, मेसेज करुन तिची विचारपूस केली. मात्र ही अफवा असल्याचं स्पष्टीकरण आलियाने स्वत: दिलं आहे.

loksatta satire article on jairam ramesh demand for marathi as classical language
उलटा चष्मा : मराठीचा अचानक कळवळा?
Ektaa Kapoor refutes Smriti Irani claim
“हे खोटं आहे”, एकता कपूरने फेटाळला स्मृती इराणींचा ‘तो’ दावा; म्हणाली, “एका सेकंदात…”
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..

पाहा आलियाची पोस्ट –
“मी चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. मात्र या साऱ्या अफा आहेत. मला कोणतीही दुखापत झालेली नाही. सध्या जी जखम दिसतेय ती जुनी असून तिने आता डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच मला एक दिवस कामातून सुट्टी घ्यावी लागली. मात्र आता सेटवर मला कोणतीही दुखापत झालेली नाही. तसंच माझ्याविषयी किंवा माझ्यासोबत काय घडलं याविषयी कोणतीही माहिती देण्यापूर्वी किंवा छापण्यापूर्वी त्या माहितीतील सत्य जाणून घ्या. काही दिवसांनी मी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तसंच माझी काळजी करुन मला मेसेज, फोन करणाऱ्यांचे मनापासून आभार”.

यामुळे पसरली अफवा-
आलियाने २० जानेवारी रोजी इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या मांजरीसोबत एक फोटो शेअर केला होता. यावेळी आईसोबत सेल्फीटाइम, कारण तिने स्वत: ला दुखापत करुन घेतली आहे आणि रात्री दोन वाजता आम्हाला याशिवाय अन्य काही काम नाही. एडी आणि मम्मी, असं कॅप्शन देत आलियाने हा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर आलियाला चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाल्याची चर्चा रंगली होती.

‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘कलंक’च्या सेटवर झाली होती जखमी –
आलिया यापूर्वी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या सेटवर जखमी झाली होती. त्यानंतर कलंकच्या सेटवरदेखील ती जखमी झाली होती. पायऱ्यांवरुन घसरल्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली होती.

‘गंगुबाई काठियावाडी’च्या रुपात दिसणार आलिया
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामध्ये आलिया मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाची कथा ‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई यांच्या जीवनाभोवती फिरताना पाहायला मिळणार आहे.गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. येथे आल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. त्या येथील महिलांना आर्थिक मदत करतात, त्यासोबतच त्यांच्या हक्कासाठीही लढा देतात. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. हे सारं काही ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.