अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘जुदाई’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. १९९७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकलं. इतकंच नाही तर या चित्रपटातील बालकलाकारांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. यामध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मुलाची रोमी वर्मा ही भूमिका करणारा बालकलाकार प्रेक्षकांना खासकरुन भावला. विशेष म्हणजे हा बालकलाकार आज बॉलिवूडमधील एक अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

रोमी वर्मा ही भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचं नाव ओमकार कपूर असं असून आज तो बॉलिवूडमधील नावाजलेला अभिनेता आहे. ओमकारची ‘जुदाई’प्रमाणेच ‘मासूम’ या चित्रपटातील भूमिकाही विशेष गाजली होती. या चित्रपटातील त्याच्यावर चित्रीत करण्यात आलेलं ‘छोटा बच्चा जान के ना कोई आखं दिखाना रे’, हे गाणं खूप लोकप्रिय झाले होते. त्यावेळी प्रत्येक लहान मुलाच्या तोंडी हे गाणे बसले होते. तसेच सलमान खानच्या ‘जुडवा’ चित्रपटात त्याने सलमानच्या लहानपणाची भूमिका केली होती. त्यानंतर त्याने ‘चाहत’ ,’हीरो नं ‘1, ‘इंटरनॅशनल खिलाडी’ ,’मेला’ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये बालकलाकारांची भूमिका केली होती.

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

दरम्यान, ‘प्यार का पंचनामा २’ या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटात त्याने ‘तरुण’ ही भूमिका साकारली होती. ‘प्यार का पंचनामा २’ नंतर तो ‘U me aur Ghar’, ‘झूठा कहीं का’ या चित्रपटांमध्येही काम केलं.