पडद्यावर दिसणारे अनेक कलाकार आपल्या अभिनयाने तमाम जनतेची मने जिंकत असतात. पण पडद्यामागील लोक लाईम लाईटपासून नेहमीच लांब असतात. मात्र या सर्वाला दिग्दर्शक सिद्धार्थ बडवे अपवाद ठरला आहे. तो लवकरच एका हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

सिद्धार्थ ‘एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर’ या हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन करक आहे. खुद्द सिद्धार्थने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एलिस फ्रेझीर यांनी केली आहे. मराठी चित्रपटातील दिग्दर्शक हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याने सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे.

सिद्धार्थने ‘हृदयांतर’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘लग्न कल्लोळ’ या आगमी चित्रपटासाठी काम करत आहे. सिद्धार्थने लहानपणीच बाल नाटकांमध्ये काम करत अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. त्याने पुण्यातून आर्किटेक्चरची पदवी घेतली. त्याचसोबत अभिनयाचे धडे घेतले. आता लवकरच तो हॉलिवूड पटात झळकणार असल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे.