केवळ गो-या मुलींना अभिनेत्री म्हणून पसंत करणा-या दर्शकांना मानसिकता बदलावयास हवी, असे श्वेता तिवारीने म्हटले आहे.
इदौर येथील एका पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय महिलांच्या रंगावरून परिचर्चा झाली. त्यावेळी श्वेता म्हणाली की, जे प्रेक्षक चित्रपट पाहावयास येतात त्यांना गो-या मुलीचं पसंत पटतात. त्यांना काळ्या मुलींना पडद्यावर पाहावयास आवडत नाही. त्यांचे हे विचार बदलण्याची गरज आहे. सावळ्या मुली कितीही रेखीव, सुंदर असो, पण गो-या मुलीचं सुंदर दिसतात अशी भारतीयांची मानसिकता आहे. पण त्याला सुंदरता नाही म्हणतं. असे म्हणत श्वेताने १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटाचे उदाहरण दिले. ती म्हणाली, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्रीच्या मनाची सुंदरतादेखील प्रकर्षाने दाखविली जाते. पण, बहुतेक प्रेक्षक ही सुंदरता पाहणं पसंत नाही करत.