scorecardresearch

“तुमच्या सगळ्यांची अप्रत्यक्षपणे लायकी काढली” – आदिश वैद्य

काही दिवसांपूर्वीच आदिशची घरात एण्ट्री झाली आहे.

“तुमच्या सगळ्यांची अप्रत्यक्षपणे लायकी काढली” – आदिश वैद्य

बिग बॉस मराठी सिझन ३ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात अभिनेता आदिश वैद्यची एण्ट्री झाली. त्याच्या एण्ट्रीने सर्वांनाच धक्का बसला. पण सध्या बिग बॉसच्या घरातील वातावरण बदलले दिसत आहे. आदिशचे सतत कोणत्या ना कोणत्या स्पर्धकासोबत वाद होत असल्याचे दिसत आहे. आता सुरेखा कुडची यांच्यासोबतही त्याचे भांडण झाले आहे.

बिग बॉस मराठीमध्ये सुरू असलेल्या “करूया आता कल्ला” या टास्कमध्ये काल सुरेखा ताईंनी आदिशला सुनावले. ‘तू आता आला आहेस बिग बॉसमध्ये आम्ही जुने आहोत’ असे सुरेखा ताई म्हणाल्या. त्यामुळे आदिशला सुरेखा यांचा प्रचंड राग आला. त्यावरूनच तो आज विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर त्याचं मत मत मांडताना दिसणार आहे. आता यावरून घरामध्ये अजून कोणता राडा होणार हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 
आदिश सुरेखा ताईंनवर आज खूप भडकलेला दिसणार आहे आणि त्याच्या मनातल्या गोष्टी तो विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर सांगणार आहे.आदिश म्हणाला, “आता टास्कमध्ये जास्त मला बोलायचं नाहीये. टास्क संपल्यावर बघूया. स्वत:ला (सुरेखा यांना) जायचं होतं कालपर्यंत बाहेर.. रडारड केली चार दिवस. माझं काय, मला खेळायचं नाही म्हणून. मी तुम्हांला स्पष्ट सांगतो वाईट नका मानून घेऊ, तुमची लायकी काढली आहे सगळ्यांची. तुमची अप्रत्यक्ष लायकी काढली.’

आदिशचे बोलणे ऐकून सोनाली म्हणाली “ती काय लायकी काढणार आमची. विशाल तुला रागाबद्दल बोले. तुलाच का रागाबद्दल बोले दुसरं कोणी रागावल नाही का यांच्या टीममधलं? हे जे फालतू थिल्लरपणा करतात ते बरोबर आहे का ? तुझा राग दिसतो ? स्नेहासोबत बरोबर गोडगोड बोलतात…  मग..”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2021 at 18:30 IST

संबंधित बातम्या