‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’च्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेकांनीच एकाहून एक लक्षवेधी पोस्ट केल्या होत्या. विविध ठिकाणांवर किंवा विविध भावना दाटून आलेलं एखादं छायाचित्र पोस्ट करत प्रत्येकानेच आपल्या अंगी असलेली कला दाखवून दिली होती. तर काहींनी या खास दिवसाच्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री दीपिका पादुकोणही यात मागे राहिली नव्हती.

दीपिकाने ‘तमाशा’ या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरचा फोटो टीपताना दिसत आहे. दीपिकाने रणबीरसोबत पोस्ट केलेला हा फोटो पाहून सर्वप्रथम अनेकांना धक्काच बसला. या फोटोला हजारो लाइक्सही मिळाले. पण, त्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाल्याचं पाहायला मिळालं. काही नेटकऱ्यांनी दीपिकाच्या या फोटोवर कमेंट बॉक्समध्ये नाराजी व्यक्त करत दीपिकाला धारेवर धरलं.

दीपिका प्रसिद्धीझोतात येण्यासाठी रणबीरच्या नावाचा वापर करत आहे, असा आरोपही तिच्यावर करण्यात आला. दीपिकाने हा फोटो पोस्ट करण्यामागचं नेमकं कारण काय, असा प्रश्नही एका युजरने उपस्थित केला. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर होणाऱ्या या टीकेला आता दीपिका काही उत्तर देते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/Bmp0fM6hhk7/

वाचा : त्याची चोरी मी पकडली होती, एक्स बॉयफ्रेंडविषयी दीपिकाने केला खुलासा

एका बाजूने सोशल मीडियाच्या माध्यमामुळे सेलिब्रिटी आणि कलाकार यांच्यातील दरी कमी झाल्याचं स्पष्ट होत आहे. असं असलं तरीही याच माध्यमामुळे सेलिब्रिटींचं होणारं ट्रोलिंग हा मुद्दासुद्धा चिंतेचा विषय ठरत आहे. अनेकदा सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा चाहते या माध्यमातून काही टीप्पणी करतात, बऱ्याचदा मर्यादा ओलांडून ही टीप्पणी केली जाते. त्यामुळे सोशल मीडिया ट्रोलिंगवर येत्या काळात नियंत्रण येणार का, हासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, असंच म्हणावं लागेल.