आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येणारं एकसनाव म्हणजे नीना गुप्ता. चौकटीबद्ध कथानकांना शह देत काही आव्हानात्मक भूमिका पार पाडत त्यांनी या कलाविश्वात आपली अशी ओळख प्रस्थापित केली. अशा या अभिनेत्रीची एक मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधतेवेळी त्यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं असून, याचवेळी कलाविश्वात आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तणूकीच्या प्रसंगाचंही कथन केलं आहे.

परदेशात ज्याप्रमाणे #MeToo आणि #timesup अशा मोहिमांअंतर्गत लैंगिक अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यात आला, त्याचप्रमाणे आपल्या कलाविश्वातही हा बदल घडून येईल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी स्वत:सोबत घडलेल्या एका प्रसंगाचं कथन केलं. ‘हो अर्थात या गोष्टी इथेही घडतील. पण, त्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. इथे लक्ष देण्याजोगी बाब अशी की, ज्यांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला ते सर्व प्रसिद्ध चेहरे आहेत. एखादा नवखा चेहरा हे असं धाडस कधीच करणार नाही’, असं त्या म्हणाल्या.

आपल्या वक्तव्याला खऱ्या प्रसंगाची जोड देत त्यांनी स्वत:सोबत घडलेला प्रसंग सर्वांसमोर उघड केला. मी ज्यावेळी मुंबईत आले होते, तेव्हा माझ्याशी एका व्यक्तीने गैरवर्तन केलं. मी त्यावेळी अगदी लहान भूमिका साकारत होते आणि समोरची व्यक्ती निर्मिती- दिग्दर्शन क्षेत्रातील मोठं नाव होतं. ज्यांतर मी एक मासिकाला याविषयीची मुलाखतही दिली. त्या प्रसंगाचं कथन केलं. पण, परिस्थिती माझ्या विरोधात होती. मला काम देण्याआधी लोक विचार करु लागलो होते. हिला आपण काही बोललो, तर ही बाहेर जाऊन एकाचं दोन करुन सांगेल असं त्यांचं मत झालं होतं. मी त्यावेळी अगदीच नवी होते आणि अशा वेळी नवोदित म्हणून काही बोलण्यास भीतीच वाटत होती’, असं त्या म्हणाल्या.

https://www.instagram.com/p/Blre7uMgcub/

Sacred Games : नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न, ‘कुक्कू’ खरंच ट्रान्सजेंडर आहे का?

चित्रपटसृष्टीकडे मोठ्या व्यापक दृष्टीने पाहणाऱ्या नीना गुप्ता यांनी सध्याच्या घडीला कलाकारांकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बऱ्याच संधी उपलब्ध असल्याचंही स्पष्ट केलं. त्यासोबतच आपण, सध्याच्या घडीला कलाविश्वात पदार्पण करणं फायद्याचं ठरलं असतं, असंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलं.