बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. त्यानंतर अवघ्या एक- दोन दिवसांतच रियाच्या लग्नाची बातमी समोर आली. तिने शिवम तिवारीशी एका खासगी सोहळ्यामध्ये बुधवारी लग्नगाठ बांधल्याची माहिती हाती आली आहे. पुण्यात अगदी निवडक आमंत्रितांच्या उपस्थितीत रिया- शिवमने त्यांच्या आयुष्याच्या या नव्या प्रवासाची सुरुवात केली.

‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवलेली रिया विवाहबद्ध झाल्यामुळे तिच्या ‘मेल फॅन्स’ची निराशा झाली आहे हे मात्र नक्की. रिया आणि शिवम बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शिवमसोबतचे बरेच फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे एका अर्थी हल्ली ट्रेंडमध्ये असणारे ‘कपल गोल्स’च ही जोडी देत आहे असं म्हणावं लागेल..

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
Seven Somali pirates arrested are minors Special Courts order of inquiry
अटक करण्यात आलेले सात सोमाली चाचे अल्पवयीन? विशेष न्यायालयाचे चौकशीचे आदेश

https://www.instagram.com/p/BXssINKgUX_/

सध्या रिया एकता कपूरच्या ‘ऑल्ट बालाजी’ या चॅनलवरील एका वेब सीरिजच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ‘रागिनी एमएमएस २.२’ असं या वेब सीरिजचं नाव असल्याचं कळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना तिच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहता येणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. ‘स्टाईल’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘झंकार बिट्स’, ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातील भूमिकांमुळे रिया चर्चेत आली होती. हिंदी सोबतच तिने बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिच्या जोडीदाराविषयी सांगायचं झालं तर, तो फोटोग्राफीच्या क्षेत्रात सक्रिय असून, विविध ठिकाणी भटकंती करण्याचीही त्याला आवड आहे. मुख्य म्हणजे रिया आणि त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून त्यांची ही आवड अनेकांचं लक्ष वेधत आहे. कलाकार कुटुंबातून आलेली रिया अगदीच यशाच्या शिखरावर पोहोचली नसली तरीही काही चित्रपटांमध्ये तिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

https://www.instagram.com/p/BUOIyv1AFLg/