बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. सोशल मीडियावरील बॉयकॉट ट्रेंडचा या चित्रपटाला चांगलाच फटका बसला. यानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घ्यायचं जाहीर केलं अन् यापुढे तो चित्रपटांची केवळ निर्मिती करणार हेदेखील मध्यंतरी त्याने स्पष्ट केलं होतं. प्रेक्षक आमिर कधी अभिनयात कमबॅक करणार याकडे डोळे लावून बसले होते.

अशातच आमिर लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे जाहीर केले. अमृत रत्न २०२३ या कार्यक्रमात आमिरने त्याच्या या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली. हा चित्रपट ‘तारे जमीन पर’पेक्षा १० पावलं पुढे असणार असल्याचंही आमिरने सांगितलं. आता या चित्रपटाबद्दल नवी माहिती समोर येत आहे. आमिरने या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘हे’ आहे रणबीर कपूरचं सीक्रेट सोशल मीडिया अकाऊंट; फोटो शेअर करत नेटकऱ्याचा मोठा खुलासा

इतकंच नव्हे या चित्रपटात आमिर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. ‘टीव्ही ९’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिर खान म्हणाला, “माझा आगामी चित्रपट ज्यात मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे ज्याचं नाव आहे ‘सितारे जमीन पर’. याचं चित्रीकरण नुकतंच सुरू झालं आहे. आमचा प्रयत्न आहे की हा चित्रपट यावर्षीच्या नाताळपर्यंत प्रेक्षकांसमोर घेऊन येऊ. हा चित्रपट मला प्रचंड आवडला आहे अन् तो तुमचंही मनोरंजन करेल.”

‘सितारे जमीन पर’बरोबरच आमिर खान आणखी काही चित्रपटात छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. पण ‘सितारे जमीन पर’मधून आमिर खान दमदार कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये आमिर खानच्या बरोबरच जिनिलीया देशमुखसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जिनिलीया नुकतीच पती रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटात झळकली अन् यातून तिने प्रथमच मराठीत पदार्पण केलं. आमिरच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.