अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची आई वृंदा राय यांचा आज वाढदिवस आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत वृंदा यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. मध्यरात्री ऐश्वर्याने आईचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्याबरोबर तिची लेक आराध्याही होती.

ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या, तिची आई वृंदा व लेक आराध्या दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत तिच्या कुटुंबातील इतर सदस्य दिसत आहेत. या फोटोंमध्ये एक नव्हे तर चार केक दिसत आहेत. ऐश्वर्याने तिच्या दिवंगत वडिलांचा फोटो हातात पकडून पोज दिली व फोटो काढले. एका फोटोत तिच्या वडिलांची फोटो फ्रेम टेबलवर ठेवल्याचं पाहायला मिळालं. ‘लव्ह यू बर्थडे गर्ल, डिअरेस्ट मॉमी’ असं कॅप्शन देत ऐश्वर्याने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

फोटोत ऐश्वर्याच्या हातावर प्लास्टर पाहायला मिळतंय. तिच्या हाताला दुखापत झाली आहे. याच जखमी हातासह तिने ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला हजेरी लावली. या सोहळ्याला तिच्याबरोबर तिची मुलगी आराध्यादेखील होती. आता या दोघींनी वृंदा राय यांच्या वाढदिवसांचं सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी बच्चन कुटुंबातील इतर कोणतेही सदस्य नव्हते, फक्त ऐश्वर्या व आराध्याच होते. ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते कमेंट्स करून तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

जया बच्चन यांना ‘या’ नावाने हाक मारायच्या रेखा; एकाच इमारतीत राहायच्या दोघी, अमिताभ अन् रेखांची पहिली भेट…

दरम्यान, ऐश्वर्याबद्दल बोलायचं झाल्यास ती दुखापतग्रस्त हातासह ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर उतरली. तिच्या हातावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्याबरोबर ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला आराध्या गेली होती, आराध्या तिच्या आईची बॅग पकडण्यापासून ते ड्रेस सांभाळण्यापर्यंत मदत करत होती. या माय-लेकीच्या व्हिडीओंची जोरदार चर्चा होती.