Premium

आनंद महिंद्रांनी केला ‘सॅम बहादूर’ चा थोडक्यात रिव्ह्यू, चित्रपट पाहण्यापूर्वी नक्की वाचा!

Anand Mahindra Sam Bahadur Review : आनंद महिंद्रा यांनी विकी कौशलचं केलं कौतुक; चित्रपटाबद्दल म्हणाले…

Anand Mahindra Sam Bahadur Review
आनंद महिंद्रा सॅम बहादुर चित्रपटाबद्दल काय म्हणाले? वाचा (फोटो – एक्स)

Anand Mahindra Sam Bahadur Review : फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जिवनावर आधारित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये सॅम माणेकशा यांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सॅम माणेकशा यांना हुबेहुब साकारल्याने विकी कौशलचं प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटाबद्दल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद महिंद्रा यांनी ‘सॅम बहादुर’ चित्रपटाबद्दल एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सॅम माणेकशा यांच्या रुपातील विकीचे दोन फोटो शेअर केले आहेत. “जेव्हा एखादा देश त्यांच्या नायकांच्या कथा सांगणारे चित्रपट बनवतो, तेव्हा एक शक्तिशाली पुण्यचक्र तयार होते. खासकरून सैनिक, नेतृत्व आणि धैर्याच्या कथांबद्दल हे होतं. अशा चित्रपटांमुळे लोकांचा अभिमान आणि आत्मविश्वास कैक पटीने वाढतो. जेव्हा लोकांना कळतं की कधीतरी त्यांच्या धैर्याचा सन्मान केला जाईल तेव्हा आणखी नायक उदयास येतात. हॉलीवूडने शतकानुशतके हे पुण्यचक्र निर्माण केले आहे. त्यामुळे रॉनी स्क्रूवाला आमच्यासाठी असे चित्रपट बनवल्याबद्दल धन्यवाद. चित्रपटात त्रुटी आहेत, पण विकी कौशलने ज्याप्रमाणे स्वतःला सॅम बहादुर यांच्या रुपात अंगावर शहारे आणणाऱ्या आणि पुरस्कार विजेत्या व्यक्तिरेखेत रुपांतरित केलंय, ते कमाल आहे. हा चित्रपट पाहा आणि एका अस्सल भारतीय नायकाचा गौरव करा,” असं आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“मी चित्रपट दोनदा पाहिला आणि…”, ‘सॅम बहादुर’बद्दल सॅम माणेकशा यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जेव्हा विकी…”

सॅम माणेकशा यांचा जीवनप्रवास सांगणाऱ्या या चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची मुलगी माया यांनी ‘इंडियन एक्सप्रे’सशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली होती. “मी चित्रपट दोनदा पाहिला आणि दोन्ही वेळा रडले. शेवटच्या दोन सेकंदात जेव्हा विकी प्रेक्षकांकडे पाहून हसतो ते पाहून मनात कालवाकालव होते,” असं त्या म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand mahindra reviews sam bahadur praised vicky kaushal hrc

First published on: 02-12-2023 at 09:33 IST
Next Story
रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…