शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई करत जवळपास ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी सध्या शाहरुखचं कौतुक करत आहेत. अक्षय कुमारने ट्वीट करत किंग खानवर कौतुकाचा वर्षाव केला होता. अक्षयप्रमाणे मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही नुकतीच ‘जवान’ चित्रपटासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “सतत मृत्यूची भीती”, काश्मीरमध्ये गेलंय प्रसिद्ध अभिनेत्याचं बालपण; म्हणाला, “भर रस्त्यात गोळीबार…”

अनुपम खेर यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत शाहरुख खान आणि संपूर्ण ‘जवान’ चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे. अभिनेते लिहितात, “मेरे प्यारे शाहरुख! आता अमृतसरला मी तुझा ‘जवान’ चित्रपट पाहिला. चित्रपटाचं कथानक, यामधील अ‍ॅक्शन, तुझा अभिनय आणि सगळ्या कलाकारांचा एकंदर परफॉर्मन्स सगळंच उत्तम आहे. चित्रपटगृहात मी एक-दोनवेळा शिट्ट्या सुद्धा वाजवल्या. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका मला आवडली.”

हेही वाचा : “शाहरुख खान आणि ॲटली यांनी जबरदस्तीने…”, ‘जवान’मधील कलाकाराचा मोठा खुलासा

अनुपम खेर पुढे लिहिताता, “‘जवान’च्या लेखक आणि दिग्दर्शकाचं मी विशेष अभिनंदन करेन…ॲटली तुझं खूप खूप कौतुक. मुंबईला आल्यावर मी शाहरुखला घट्ट मिठी मारून ओ पोची, ओ कोकी, ओ पोपी, ओ लोला असं बोलणार आहे.” शाहरुख खान आणि अनुपम खेर यांनी बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

हेही वाचा : प्रियाचा खोटेपणा अर्जुन सर्वांसमोर आणेल का? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार रंजक वळण, जुई गडकरीने शेअर केला प्रोमो

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher praised shahrukh khan jawan movie and shared special post sva 00
First published on: 12-09-2023 at 14:30 IST