सलमान खानच्या घरी दरवर्षी मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते. यंदाही भाईजानच्या राहत्या घरी ईद निमित्ताने गुरुवारी ग्रॅण्ड पार्टीचं आयोजन केलं जातं. त्याच्या घरगुती पार्टीला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. बॉबी देओल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, प्रीती झिंटा, अरबाज खान, जिनिलीया देशमुख असे बरेच कलाकार या पार्टीत सहभागी झाले होते.

सलमान खानच्या पार्टीला यंदा जिनिलीयाने खास उपस्थिती लावली होती. रितेश कामानिमित्त बाहेरगावी असल्याने ती एकटीच या पार्टीला आली होती. पार्टीचा Inside फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कांची, सलमानची बहीण अर्पिता आणि जिनिलीया एकत्र पोज देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : राजकीय पक्षांचा प्रचार करणार का? स्वप्नील जोशीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “पैसे घेऊन विशिष्ट…”

जिनिलीया आणि अर्पिता यांची गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. या फोटोला अभिनेत्रीने “माझ्या लाडक्या मैत्रिणींबरोबर ईद साजरी केल्याचा आनंद…आम्ही एकत्र असल्यावर नेहमीच आनंदी असतो” असं कॅप्शन दिलं आहे. सलमानच्या पार्टीचे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात झाली अँजिओप्लास्टी; प्रकृतीबाबत डॉक्टर माहिती देत म्हणाले…

जिनिलीया देशमुखची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, ईदच्या निमित्ताने यावर्षी सलमानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. यामुळे अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना मोठं सरप्राइज देत आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी ईदला सलमान खान प्रमुख भूमिकेत असलेला ‘सिकंदर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.