हेमा मालिनी व धर्मेंद्र यांनी मोठी मुलगी ईशा देओल पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. भरत व ईशा यांनी संयुक्तपणे त्यांच्या घटस्फोटाबाबत माहिती दिली आहे. ईशा व भरत यांचं लग्न २९ जून २०१२ रोजी साध्या पद्धतीने इस्कॉन मंदिरात झालं होतं. या जोडप्याला राध्या व मिराया नावाच्या दोन मुली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक दिवसांपासून ईशा पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याच्या चर्चा होत होत्या. अखेर दोघांनी दिल्ली टाइम्सला निवेदन देत घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलंय. लग्नाच्या ११ वर्षानंतर परस्पर संमतीने वेगळे होत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा आणि भरत यांच्या नात्यात दुरावा आला होता, खुद्द ईशाने तिच्या पुस्तकात याबाबत लिहिलं आहे.

“भयंकर मेसेज, कमेंट्स, धमक्या…”, ललित कला केंद्रातील हल्ल्याबद्दल भूमिका घेतल्यानंतर प्रियदर्शिनी इंदलकरला आले वाईट अनुभव

लग्नाच्या पाच वर्षानंतर ईशा व भरत या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. ईशाने २०१७ मध्ये मुलगी राध्याला जन्म दिला. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांची दुसरी मुलगी मिरायाचा जन्म झाला. ईशाने २०२० मध्ये ‘अम्मा मिया: स्टोरीज, ॲडव्हाइस अँड रेसिपीज फ्रॉम वन मदर टू अदर’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात तिने सांगितलं होतं की तिच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर भरतला दुर्लक्षित वाटत होतं, कारण ती त्याला वेळ देऊ शकत नव्हती.

“जनता मूर्ख नाही”, राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या निकालानंतर तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “बेईमानी…”

‘डीएनए’ च्या वृत्तानुसार, ईशाने पुस्तकात लिहिलंय, “माझ्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर काही काळाने माझ्या लक्षात आलं की भरत चिडचिड करत होता आणि माझ्यावर चिडायचा. त्याला वाटलं की मी त्याच्याकडे नीट लक्ष देत नाही. नवऱ्याला असं वाटणं अगदी साहजिक आहे, कारण त्यावेळी मी राध्याच्या प्लेस्कूलच्या गोष्टीत आणि मिरायाला खाऊ घालण्यात व्यग्र होते.”

ईशाने पुढे लिहिलं, “मी माझे पुस्तक लिहिण्यात आणि प्रोडक्शन मीटिंगमध्ये व्यस्त होते. त्यामुळेच त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय, असं त्याला वाटत होतं. मला माझ्या चुका लगेच लक्षात आल्या. भरतने माझ्याकडे नवीन टूथब्रश मागितला होता पण मला ते लक्षातच नव्हतं. अनेकदा त्याचे शर्ट इस्त्री झालेले नसायचे, काही वेळा मी त्याच्या जेवणाकडे लक्ष न देता कामावर पाठवायचे, तेव्हाची वेळ मला आठवली.”

“दिल्लीचा दगा महाराष्ट्राला…”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत खासदार अमोल कोल्हेंची निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया

ईशाने लिहिलं, “त्याच्या गरजा खूप कमी आहे आणि जर मी त्याची काळजी घेऊ शकत नाही म्हणजे तर काहीतरी गडबड आहे. मी ताबडतोब माझ्या चुका दुरुस्त करायचं ठरवलं. मग मला समजलं की बराच काळ झाला मी त्याच्याबरोबर डेट नाईट किंवा चित्रपट पाहण्यासाठी गेले नाही. मग मी जरा नीट आवरून छान ड्रेस घालायचं आणि वीकेंडला त्यांच्यासोबत बाहेर जायचं ठरवलं.”

ईशा आणि भरतच्या विभक्त झाल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. काही महिन्यांपूर्वी सासू हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भरत तख्तानी सहभागी झाला नव्हता, तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. अखेर दोघांनी ते विभक्त झाल्याचं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once esha deol revealed bharat takhtani was irritated after 2nd daughter birth hrc
First published on: 07-02-2024 at 15:34 IST