बॉलीवूड अभिनेता जॅकी भगनानी व अभिनेत्री रकुल प्रीत सिंग २१ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. गोव्यात त्यांच्या शाही लग्नसोहळ्याची तयारी करणात आली होती. कुटुंबीय व जवळच्या मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. जॅकी व रकुलच्या लग्नाला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर गोव्यात समुद्रकिनारी दोघांनी लग्नगाठ बांधली. रकुल व जॅकीच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. जॅकीने पांढऱ्या रंगाची शेरवानी परीधान केली होती तर रकुलने बेबी पिंक रंगाचा सुंदर लेहंगा व त्यावर भरजरी दागिने घातले होते. या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.

हेही वाचा- “नवरा म्हणून माझ्यात काय कमी होती?” घटस्फोटानंतर आमिर खानने किरण रावला विचारलेला प्रश्न; ती म्हणालेली, “तुला नेहमी…”

लग्नानंतर सासरी रकुलचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नुकताच अभिनेत्राच्या सासरी चौका चारधाना समारंभ झाला. यावेळी रकुलने सासरच्या मंडळीसाठी शिरा बनवला होता. रकुलने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिने बनवलेला शिरा बघायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत रकुलने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चौका चारधाना.’

लग्नानंतर रकुल-जॅकी हनिमूनला कुठे जाणार?

गोव्यात लग्न केल्यानंतर रकुल व जॅकी हनिमूनला कुठे जाणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, रकुल व जॅकीने लग्नानंतर हनिमूनला जाण्याची योजना रद्द केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण- व्यग्र वेळापत्रकामुळे दोघे लग्नानंतर काही दिवसांमध्येच कामावर परतणार आहेत.