सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आणखी एका संशयिताला बुधवारी रात्री हरियाणातून ताब्यात घेण्यात आलं आहे. या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि शूटर्स विकी गुप्ता व सागर पाल यांच्याशी संपर्क साधला होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी (१४ एप्रिलला) पहाटे पाच वाजता वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या घरावर पाच राऊंड गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून गेले होते, अटकेतील दोन संशयितांपैकी सागर कुमार पलक याला घटनेच्या काही तासआधी १३ एप्रिलच्या रात्री वांद्रे परिसरात बंदूक पुरवण्यात आली होती. पण बंदूक पुरवणाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं. दोन्ही आरोपी बिहारमधील पश्चिम चंपारणचे आहेत. त्यांना घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आली. याबाबत ‘एनडीटीव्ही’ने वृत्त दिलंय.

सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर कसं दिसतं? पाहा Inside Photos

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल आणि त्याचा साथीदार विक्की या दोघांनाही गोळ्या झाडण्यासाठी चार लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, त्यापैकी एक लाख रुपये आधीच देण्यात आले होते. गोळ्या झाडणाऱ्यांचा उद्देश सलमान खानची हत्या करणं हा नव्हता, तर त्याला घाबरवण्याचा होता, असं मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर

“आरोपींनी सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसची रेकी केली होती. अभिनेत्याचा खून करणं नाही तर त्याला घाबरवणं हा त्यांचा हेतू होता. बिहारमध्ये दोघांच्याही कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हरियाणा आणि इतर राज्यातून आतापर्यंत सात जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे आणि या प्रकरणी तपास केला जात आहे,” असं मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने एएनआयने वृत्त दिलंय.

घरावर गोळीबार झाल्यावर सलमान खानचा मोठा निर्णय, अभिनेत्याने सांगितलं की कोणीही आता…

मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणात साक्षीदार म्हणून सलमान खानचा जबाब नोंदवणार आहे. ही घटना घडल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमानची त्याच्या घरी भेट घेतली. “सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं मी सलमान खानला सांगितलं आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जाईल. आम्ही प्रकरणाची सखोल चौकशी करू,” असं शिंदेंनी अभिनेत्याच्या घराबाहेर पत्रकारांना म्हटलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan house firing case vicky gupta and sagar kumar palak took four lakh supari hrc