Swatantra Veer Savarkar Total box office Collection: वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस झाले आहेत. हा चित्रपट २२ मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने २० दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे, ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाद्वारे रणदीप हुड्डाने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. तसेच त्यानेच चित्रपटात वीर सावरकरांची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ च्या वृत्तानुसार, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ११.३५ कोटींची कमाई केली, दुसऱ्या आठवड्यात ६.४ कोटी रुपयांची कमाई केली आणि या चित्रपटाने तीन आठवड्यात एकूण २१.९ कोटींची कमाई केली आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी वडिलांची मालमत्ता विकली, रणदीप हुड्डाचा खुलासा; म्हणाला, “मी खूप…”

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटासाठी अभिनेता रणदीप हुड्डाने खूप मेहनत घेतली. या चित्रपटासाठी वडिलांची मुंबईतील मालमत्ता विकावी लागली, असा खुलासा त्याने केला. इतकंच नाही तर वीर सावरकर यांच्या भूमिकेसाठी वजन कमी करताना आणि वजन कमी केल्यावर आलेल्या अडचणींबाबतही त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

“नथुराम गोडसे सादर करताना तो महात्मा गांधींचं वचन…”, संजय मोनेंनी शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ पोस्टवर केलेली कमेंट चर्चेत

“मला हा चित्रपट गेल्या वर्षी १५ ऑगस्टला किंवा त्यानंतर २६ जानेवारीला प्रदर्शित करायचा होता. मी खूप मेहनत घेतली, पण तरीही तो पूर्ण होऊ शकला नाही. आम्हाला खूप अडचणी आल्या, कारण सुरुवातीला या चित्रपटाशी जोडलेल्या टीममधील लोकांचा दर्जेदार चित्रपट बनवण्याचा हेतू नव्हता. त्यांना फक्त चित्रपटाची निर्मिती करायची होती. आम्हाला आर्थिक अडचण आल्या. माझ्या वडिलांनी बचत करून माझ्यासाठी मुंबईत दोन-तीन प्रॉपर्टी विकत घेतल्या होत्या, मी त्या विकून आलेले पैसे चित्रपट निर्मितीसाठी वापरले. माझ्या या चित्रपटाला कोणाचाही पाठिंबा नव्हता,” असं रणदीप काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swatantra veer savarkar box office collection day 20 randeep hooda movie hrc