‘धर्मवीर २’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा चालू आहे. नुकताच या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत हा बहुचर्चित चित्रपट येत्या ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असतानाच नुकताच चित्रपटाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. या चित्रपटाच्या पहिल्याच टीझरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की…” टीझरमधील हा संवाद लक्षवेधी ठरतो.

हेही वाचा : Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील परफॉर्न्ससाठी बादशाहने घेतलं ‘इतकं’ मानधन, बॉलीवूड सेलिब्रिटींसह पंड्याही थिरकला रॅपरच्या गाण्यांवर

‘धर्मवीर २’ च्या टीझरने वेधलं लक्ष

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार, आनंद दिघे यांच्याकडे एक मुस्लीम महिला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला येते. तेव्हा तिला चेहरा दाखवण्यास सांगितलं जातं. संबंधित महिलेने बुरखा बाजूला करून चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं आनंद दिघे यांना समजतं. यावर ते संतापतात. बहिणीचं रक्षण करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या सगळ्या स्त्रियांना घेऊन आनंद दिघे त्या महिलेच्या घरी जातात. यावेळी “ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की…” असं सांगत ते संबंधित महिलेला मारहाण करणाऱ्याला चांगलाच धडा शिकवतात. असा अंगावर काटा आणणारा प्रसंग ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

हेही वाचा : Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा : सुबोध भावेच्या नवीन मालिकेत कोण असेल खलनायिका, वर्षभराने छोट्या पडद्यावर परतणार, कोण आहे ‘ती’ अभिनेत्री?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धर्मवीर २’ च्या या टीझरवर नेटकऱ्यांसह दिग्दर्शक रवी जाधव, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, श्रुती मराठे या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘धर्मवीर २’बद्दल सांगायचं झालं, तर या सिनेमाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची, तर क्षितीश दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.