रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी म्हणजेच २२ मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित झाला. एका आठवड्यात या चित्रपटाने ११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितासाठी आपण जवळचे पैसे खर्च केले आहेत, असं रणदीपने सांगितलं. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी घेतलेली मुंबईत प्रॉपर्टी विकून त्याने या चित्रपटाची निर्मिती केली, असं एका मुलाखतीत तो म्हणाला.

‘बिअरबाइसेप्स’ पॉडकास्टमध्ये रणदीप हुड्डाने हजेरी लावली. यावेळी त्याने या चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रवासाबद्दल सांगितलं. हा चित्रपट जगभरात पाहिला जावा आणि निवडणुकीचं वर्ष असल्याने त्याला उजव्या विचारणीचा सिनेमा समजून दुर्लक्ष करू नये, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. रणदीपने त्याला आलेल्या आर्थिक अडचणींबाबत या मुलाखतीत भाष्य केलं. तसेच चित्रपटात सावरकरांचे पात्र साकारण्यासाठी त्याने वजन खूप कमी केलं होतं. तर, इतकं वजन कमी केल्यावर आलेल्या अडचणींबद्दलही त्याने सांगितलं.

“नथुराम गोडसे सादर करताना तो महात्मा गांधींचं वचन…”, संजय मोनेंनी शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ पोस्टवर केलेली कमेंट चर्चेत

“मला हा चित्रपट गेल्या वर्षी १५ ऑगस्टला किंवा त्यानंतर २६ जानेवारीला प्रदर्शित करायचा होता. मी खूप मेहनत घेतली, पण तरीही तो पूर्ण होऊ शकला नाही. आम्हाला खूप अडचणी आल्या, कारण सुरुवातीला या चित्रपटाशी जोडलेल्या टीममधील लोकांचा दर्जेदार चित्रपट बनवण्याचा हेतू नव्हता. त्यांना फक्त चित्रपटाची निर्मिती करायची होती. आम्हाला आर्थिक अडचण आल्या. माझ्या वडिलांनी बचत करून माझ्यासाठी मुंबईत दोन-तीन प्रॉपर्टी विकत घेतल्या होत्या, मी त्या विकून आलेले पैसे चित्रपट निर्मितीसाठी वापरले. माझ्या या चित्रपटाला कोणाचाही पाठिंबा नव्हता,” असं रणदीप म्हणाला.

अक्षय कुमारशी ब्रेकअप झाल्यावर केलेला आत्महत्येचा प्रयत्न? रवीना टंडन पहिल्यांदाच उत्तर देत म्हणाली, “खूप सारी…”

वीर सावरकर यांच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्याचा अनुभव रणदीपने सांगितला. वजन ६० किलोपर्यंत कमी केलं होतं, पण ते वजन वाढू न देता तितकंच ठेवून नीट आहार न घेता चित्रपट दिग्दर्शित करणं हे मोठं आव्हान होतं. “मी फक्त पाणी, ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी पीत असेल. नंतर मी माझ्या आहारात डार्क चॉकलेट आणि नट्स आणि इतर पदार्थ समाविष्ट केले. माझ्या आहारामुळे माझी झोप कमी होऊ लागली होती. त्यामुळे कित्येकदा मी सेटवर पडलो होतो,” असं रणदीपने सांगितलं.