अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. तापसी तिचा बॉयफ्रेंड व प्रसिद्ध बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर मागच्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता या नात्याला हे जोडपं पुढच्या टप्प्यात नेणार असून त्यांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

तापसी आणि मॅथियासचं लग्न शीख आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने होईल, त्यांचं लग्न मार्च महिन्यात राजस्थानमधील उदयपूर इथं होईल, या लग्नाला फक्त या दोघांचे कुटुंबीय व जवळचे लोक उपस्थित राहतील आणि कोणत्याही बॉलीवूड कलाकारांना लग्नासाठी निमंत्रित केले जाणार नाही, असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले होते. दरम्यान, या सर्व चर्चांवर तापसीने मौन सोडलं आहे.

‘या’ प्रसिद्ध परदेशी खेळाडूला १० वर्षांपासून डेट करतेय तापसी पन्नू; खुलासा करत म्हणाली, “माझा त्याला सोडण्याचा…”

तापसी ‘इंडिया टुडे’ शी बोलताना म्हणाली, “माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत मी कधीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि भविष्यात कधीच देणार नाही.” तापसीने प्रतिक्रिया दिली असली तरी ती लग्न करणार की नाही याबाबत तिने स्पष्ट माहिती दिलेली नाही.

तापसी पन्नू व मॅथियस यांची पहिली भेट कुठे झाली होती? अभिनेत्रीनेच केला खुलासा

दरम्यान, तापसीला काही महिन्यांपूर्वी एका चाहत्याने विचारलं होतं की ती कधी लग्न करणार आहे. यावर तापसी म्हणाली होती “मी अद्याप गरोदर नाही, त्यामुळे इतक्यात तरी नक्कीच लग्न करणार नाही. लग्नाबद्दल मी तुम्हा सर्वांना कळवेन. मला जेव्हा मुलं हवी असतील तेव्हाच मी लग्न करेन,” असंही तिने सांगितलं होतं.