बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनविरोधात एका वकिलाने न्यायालयात धाव घेतली असून केस दाखल केली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर न्यायालयात ही केस दाखल करण्यात आली आहे. रवीना टंडनमुळे वाहतूक कोंडी झाल्याचा वकिलाचा दावा आहे. गेल्या आठवड्यात रवीना टंडन एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी मुझफ्फरपूरमध्ये आली होती.

12 ऑक्टोबरला रवीना टंडन एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आली होती. वकिलाने मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात केस दाखल केली असून यामध्ये हॉटेलचे मालक प्रणव कुमार आणि उमेश सिंह यांच्याही नावाचा उल्लेख आहे.

रवीना टंडन उद्घाटनाला आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे सर्वसामान्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागला असा आरोप याचिकाकर्त्या वकिलाने केला आहे. कार्यक्रमामुळे आपणही दोन तास वाहतूक कोंडीत अडकल्याचं त्यांनी म्हटलं आहे. न्यायालय 2 नोव्हेंबरला याप्रकरणी सुनावणी घेणार आहे.