टेलिव्हिजनवर अनेक वर्षांपासून सुरू असणारी लोकप्रिय मालिका कोणती असे कोणालाही विचारल्यास ‘सीआयडी’ हे नाव नक्कीच ऐकायला मिळणार. सरकार बदललं, मुलं लहानाची मोठी झाली तरी गेल्या १९ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. टेलिव्हिजनवर सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली ही एकमेव मालिका असेल. गेल्या १९ वर्षांत मालिकेतील काही पात्रेही बदलली. दीर्घकाळापासून चाललेल्या या मालिकेतील कलाकारांना मानधन किती मिळत असेल, असा प्रश्न अनेकांच्याच मनात डोकावत असेल. या कलाकारांच्या मानधनाचा आकडा विविध वेबसाइट्सवर प्रसिद्ध केला असून मालिकेशी निगडीत व्यक्तींनी अद्याप याविषयी काहीच स्पष्ट केलेले नाही. पण या कलाकारांचे मानधन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

या कलाकारांच्या मानधनाचा आकडा पाहता टेलिव्हिजनला छोटा पडदा म्हणण्याचा काळ गेला असं म्हणावं लागेल. कारण, आता टेलिव्हिजनची कलाकार मंडळी चित्रपटातील कलाकारांइतकेच पैसा कमवू लागले आहेत. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची काम करण्याची पद्धतही वेगळी असते. सोनी वाहिनीवरील ‘सीआयडी’ मालिकेतील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणजे ‘एसीपी प्रद्युम्न’. अभिनेते शिवाजी साटम गेली १९ वर्षे ‘एसीपी प्रद्युम्न’ ही भूमिका साकारत आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का, ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते किती मानधन घेतात? ‘देसी मार्टिनी’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शिवाजी साटम एका एपिसोडसाठी ५ लाख रुपये इकते मानधन घेतात. विशेष म्हणजे साटम ‘सीआयडी’ मालिकेसाठी महिन्यातून फक्त १५ दिवस काम करतात.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच

मालिकेत ‘सिनीअर इन्स्पेक्टर अभिजीत’ची भूमिका साकारणारा आदित्य श्रीवास्तव एका एपिसोडसाठी ८० हजार ते १ लाख रुपये मानधन घेतो.

कुठलाही दरवाजा तोडण्यासाठी नेहमीच सज्ज असणारा मालिकेतील ‘इन्स्पेक्टर दया’ एका एपिसोडसाठी १ लाख रुपये घेतो.

२०१२ पासून या मालिकेत ‘श्रेया’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जान्हवी छेडा एका एपिसोडसाठी ४५ हजार रुपये घेते.

मालिकेला विनोदी तडका देणारी भूमिका ‘फ्रेड्रिक्स’ची आहे. ही भूमिका साकारणारा दिनेश फडणीस एका एपिसोडसाठी ७० ते ८० हजार रुपये घेतो.

‘पूर्वी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्शा सय्यद एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये घेते.

मालिकेत फॉरेन्सिक लॅबमध्ये ‘डॉक्टर साळुंखे’सोबत काम करणारी ‘डॉ. तारिका’ म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा मुसळे एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये घेते.

सब इन्स्पेक्टर ‘ताशा’ची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री वैष्णवी धनराज एक एपिसोडसाठी ५० हजार रुपये घेते.

(वरील मजकूर काही वेबसाइट्सवरील उपलब्ध माहितीच्या आधारे घेण्यात आला असून लोकसत्ता ऑनलाइनने याबाबत खातरजमा केलेली नाही.)