Janhvi kapoor Interview for Vogue magazine : जान्हवी कपूरविषयीच्या ‘या’ खास गोष्टी माहिती आहेत?

Janhvi kapoor Interview for Vogue magazine, अभिनेत्री आणि एक महिला म्हणून तिने इतर गोष्टींकडे पाहण्याचा आपला व्यापक दृष्टीकोनही सर्वांसमोर ठेवला.

Janhvi kapoor Interview
Janhvi kapoor Interview for Vogue magazine, जान्हवी कपूर

Janhvi kapoor Interview for Vogue magazine. Dhadak Movie trailer.
हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज होत अखेर नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘धडक’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी फार आधीपासून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी प्रकाशझोतात आली होती. साधारण गेल्या वर्षभारापासून माध्यमांमध्ये, विविध कार्यक्रमांमध्ये जान्हवीचा वावर पाहायला मिळाला आहे. त्यामुळे एका अर्थी ही स्टारकिड अनेकदा चर्चेचाही विषय ठरली आहे.

जान्हवीच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी तिची एक मुलाखत अनेकांचच लक्ष वेधून गेली. ही मुलाखत होती ‘वोग’ मासिकाची. पहिल्यावहिल्या मॅग्जिन कव्हर फोटोशूटच्या निमित्ताने जान्हवीच्या अदा खऱ्या अर्थाने बऱ्याचजणांना घायाल करुन गेल्या. वोग इंडियाच्या याच फोटोशूट आणि मुलाखतीतील व्हिडिओची सुरेख झलक नुकतीच त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनलवर पोस्ट करण्यात आली. ज्यामध्ये जान्हवी कपूरने स्वत:विषयी काही गोष्टींचा उलगडा केला. तर, अभिनेत्री आणि एक महिला म्हणून तिने इतर गोष्टींकडे पाहण्याचा आपला व्यापक दृष्टीकोनही सर्वांसमोर ठेवला.

जवळपास अडीच मिनिटांहूनही कमी वेळाच्या या व्हिडिओमध्ये जान्हवी तिच्या आवडत्या अभिनेत्रींपासून ते अगदी तिच्या फॅशन इन्स्पिरेशनपर्यंत साऱ्याचाच उलगडा करताना दिसत आहे. आपली फॅशन इन्स्पिरेशन ही आपली आई म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी असल्याचं ती स्पष्टपणे सांगताना दिसते. तर आवडत्या अभिनेत्रींविषयी विचारलं असता ती मेरिल स्ट्रीप, नूतन, मधुबाला, वहिदा रेहमान आणि मीना कुमारी या तारकांची नावं घेते.

हिंदी चित्रपटसृष्टीत एखाद्या तगड्या चित्रपटाने पदार्पण करणं कोणत्याही कलाकारासाठी तितकच महत्त्वाचं असतं. जान्हवीच्या वाट्यालाही ही संधी आली आणि आता ट्रेलर पाहता तिने या संधीचं सोनं केलं असंच म्हणावं लागेल. ‘धडक’ Dhadak चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं ही जणू एक अतिव महत्त्वाची भेटवस्तूच आहे, असं जान्हवी म्हणते. तर, एक महिला म्हणून सर्व महिलांनी एकमेकींच्या आनंदात सहभागी व्हावं असा दृष्टीकोनही ती देऊन जाते.

वाचा : Blog : ‘धडक’च्या जान्हवीला बघण्यासाठी श्रीदेवी तू आज हवी होतीस!

‘धडक’चा ट्रेलर आणि वोग फोटोशूटच्या निमित्ताने सर्वांच्या भेटीला आलेल्या जान्हवीला या कलाविश्वात बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. ज्यासाठी ती प्रयत्नशील असून, त्या अनुषंगाने तिने मेहनत घेण्यासही सुरुवात केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dhadak bollywood movie sridevi boney kapoor daughter janhvi kapoor magazine photoshoot cover for vogue behind the scene video

ताज्या बातम्या