करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. परिणामी देशभरातील अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत रिकामी सिनेमागृह पाहून अभिनेता धर्मेंद्र मात्र दु:खी झाले आहेत. ही शांतता आता सहन होत नाही, असं म्हणत त्यांनी सिनेमागृहांसाठी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

अवश्य पाहा – उर्वशी रौतेलाने गौतम गुलाटीसोबत केलं लग्न?; फोटो पोस्ट करुन म्हणतोय शुभेच्छा द्या

धर्मेंद्र यांनी राखी सिनेमागृहाचा फोटो पोस्ट केला आहे. “राखी सिनेमागृह, लुधियाना… इथे आम्ही कित्येक चित्रपट पाहिले आहेत. आता ही शांतता सहन होत नाही. उदास व्हायला होतं.” अशा आशयाचे ट्विट करुन धर्मेंद्र यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. धर्मेंद्र गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. ते समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर प्रतिक्रिया देत आहेत. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – सुशांतने आत्महत्या केल्यापासून अभिनेत्री पडली आजारी; होऊ लागलाय लो बीपीचा त्रास

देशात गेल्या २४ तासांत २२, ७७१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. करोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांच्या झपाट्याने वाढत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. शिवाय दररोजच्या वाढत्या संख्येपुढे देशातील आरोग्य यंत्रणा कशी पुरी पडणार, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६,४८,३१५ इतकी झाली आहे. यापैकी दोन लाख ३५ हजार ४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन लाख ९४ हजार २२७ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत देशभरात १८, ६५५ लोकांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.